Vikram Gokhale
Vikram Gokhale sarkarnama
पुणे

मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही, जे सत्तर वर्षात झालं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करीत आहेत. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र (BJP Shiv Sena alliance) आल्यास फार बरं होईल,'' असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) यांनी व्यक्त केलं. ते माध्यमांशी बोलत होते.

''शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे, याबाबत मी पुढाकार घेतला आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा 'चूक झाली' असं उत्तर फडणवीसांनी दिलं,'' असे गोखले म्हणाले. ''मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विक्रम गोखले म्हणाले, ''कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही, ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे ? माझ्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही,''

लाल बहादूर शास्त्री सोडून मी देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो, पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते, ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो.किती वर्षे कारस्थान आहे ? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे,'' असे गोखले म्हणाले.

''देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. त्यापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरीता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाहीमी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, नव्हतो आणि नसेन,'' असे विक्रम गोखले यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT