Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : जेपीसी पेक्षा कोर्टाची कमिटीच अधिक विश्वसनीय ; शरद पवारांचा पुनरुच्चार ; 'हिंडनबर्ग' मला..

सरकारनामा ब्यूरो

Adani Being Targeted Says Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल (शुक्रवारी) एका कार्यक्रमात हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहावर आरोप झाल्याप्रकरणात मोठे विधान केले आहे. त्यानंतर आजच्या (शनिवारी) पत्रकार परिषदेत त्यांनी जेपीसी गठीत करणे अयोग्य असल्याचे सांगितले.

शरद पवार म्हणाले, "मी हिंडनबर्ग कंपनीचे नाव कधी ऐकलेलं नव्हतं. त्या कंपनीच्या अहवालात अदानींना लक्ष्य करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची (JPC) आवश्यकता राहिली नाही,"

"जेपीसीमध्ये २१ पैकी १५ सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. यात सत्ताधारी अधिक आहेत. त्यामुळे तेथे संशय निर्माण होऊ शकतो.पण माझा त्याला सरसकट विरोध नाही.जोपीसीपेक्षा न्यायालयाची समिती अधिक विश्वसनीय आहे," असे शरद पवार म्हणाले.

अदानी प्रकरणावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मतभेद निर्माण झाले आहेत. त्यावर "विरोधक एकत्रच आहेत, मात्र काही मुद्दांवरुन त्यांच्यात मतभेद असू शकतात," असे पवारांनी स्पष्टीकरण केले. काँग्रेसच्या जोरकस भूमिकेला पवारांनी छेद दिल्याची चर्चा आहे. यावेळी "अदानी मुद्दांपेक्षा महागाई , बेरोजगारी अधिक महत्व दिले पाहिजे," असे पवार म्हणाले.

काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले होते की एका परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडाली. अशाप्रकारची वक्तव्ये याआधीही काही लोकांनी केली होती. काही दिवस संसदेत यावरुन गदारोळही झाला होता. आम्ही तर या कंपनीचं नवा देखील कधी ऐकलं नव्हतं.त्या कंपनीची पार्श्वभूमी माहिती नाही. अशा विषयावर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते हे दुर्लक्षित करता येणार नाही.

पवार यांनी मुलाखतीत संसद अधिवेशन, अदानी आदी अनेक मुद्यांवर भाष्य केले. संसदेच्या वाया गेलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज व्हावे, या दृष्टीने सत्ताधारी पक्षाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न न झाल्याने पवार यांनी खंत व्यक्त केली.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT