Sanjay Raut, Rahul Kul
Sanjay Raut, Rahul Kul Sarkarnama
पुणे

Sanjay Raut in Daund : १४४ कलम लावूनही संजय राऊत कारखान्यावर गेलेच! आता दौंडमध्ये धडाडणार तोफ, निशाण्यावर कोण?

सरकारनामा ब्युरो

Rahul Kul vs Sanjay Raut : दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखान्यात तब्बल ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे आमदार राहुल कुल यांना धारेवर धरले आहे. त्याच पार्श्वभूमिवर आज संजय राऊत यांची दौंड तालुक्यातील वरंवड येथे सभा होणार आहे. दरम्यान, भीमा पाटस कारखान्यावर १४४ कलम लागू केले. जमावबंदी लागू असली तर संजय राऊत कारखान्यावर गेले. तेथे त्यांनी कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय मधुकरनाना शितोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, शिंदे गटावर टीका करताना राऊत (Sanjay Raut) यांनी 'हे विधीमंडळ नसून चोरमंडळ' असल्याचे म्हटले होते. त्यावरून राऊतांवर हक्कभंगाचा आरोप ठेवण्यात आला. त्या प्रकरणाची समितीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. त्या चौकशी समितीचे अध्यक्ष दौंडचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) आहेत. त्यानंतर राऊत यांनी कुल यांच्यावर वारंवार निशाणा साधला आहे. आमदार कुल यांच्या संबंधित असलेल्या भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला. त्याबाबत फडणवीस यांना पुरव्यांसह दहा पानांचे पत्र पाठविले. त्यानंतरही मनीलाँड्रिंगप्रकरणी कुठलीही कारवाई झाली नसल्याचा आरोप राऊत करीत आहेत.

अनेक दिवसांपासून या सभेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता सभा होत असल्याने संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भीमा पाटस कारखाना परिसरात जमावबंदी लागू केल्याने राजकीय वातावरण तापल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भीमा पाटस कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात आता राऊत त्यांची वरंवड (Daund) येथे सभा होत आहे. त्यासाठी ते दौंडमध्ये पोहचले आहेत. दरम्यान, ते कारखान्यावर संस्थापक मधुकरनाना शितोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याने तेथे जमावबंदीचे आदेश लागू केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे वाहन रस्त्यातच अडविले. यावेळी त्यांनी पोलिसांना हक्कभंगाच्या कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर त्यांची एकच वाहन कारखान्यात सोडण्यात आले. आता यानंतर वरवंड येथे होणाऱ्या सभेत राऊत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दौंड बाजार समितीच्या निवडणुकीत दौंडचे विद्यमान भाजप आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार रमेश थोरात आमने-सामने ठाकले आहेत. राज्य आणि केंद्रातील सत्तेचा फायदा होण्यासाठी बाजार समिती भाजप पुरस्कृत पॅनलला विजयी करा, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले आहे. मात्र राऊत यांच्या सभेनंतर दौंड बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा होणार का, याकडेही तालुक्यातून लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT