Hemant Rasane Sarkarnama
पुणे

Hemant Rasane News : मोहोळ, बिडकरांपाठोपाठ आता रासनेही धंगेकरांच्या विरोधात आक्रमक!

MLA Ravindra Dhangekar : '...त्यांचा इतिहास हा त्याच पद्धतीचा असून मुजोरी त्यांच्या रक्तात आहे,' असंही ते म्हणाले आहेत.

Sudesh Mitkar

Pune Political News : महापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाकीवरून सुरू झालेलं काँग्रेस आणि भाजपमधील श्रेयवादाचे राजकारण थांबताना दिसत नाही. टाकीच्या उद्घाटनावरून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपचे स्थानिक नेते धंगेकरांवर तुटून पडले आहेत. भाजप नेत्यांकडून त्या घटनेचा व्हिडीओ विविध सोशल मीडियावर टाकून धंगेकर यांच्यावर तोंडसुख घेतलं जात आहे.

माजी उपमहापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर या दोन्ही नेत्यांनी धंगेकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करत ही मस्ती आली कुठून? असा सवाल केला आहे. आता या वादात कसबा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीेखील उडी घेतली आहे. (Hemant Rasane Vs Ravindra Dhangekar)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शिवीगाळ केली, ही गोष्ट निंदनीय आहे. आपण एखाद्या पदावर असताना जबाबदारीचे भान असणं आवश्यक आहे. मात्र त्यांचा इतिहास हा त्याच पद्धतीचा असून मुजोरी त्यांच्या रक्तात आहे,' अशी टीका हेमंत रासने यांनी केली.

याशिवाय 'पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये एखाद्या नेत्याचं नाव नाही, म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे शिव्या देणं हे निषेधार्ह आहे. ज्यांच्यावर लोकशाही सक्षम करण्याची जबाबदारी आहे, तेच लोकशाहीला मारक असं काम करत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना गेली वीस वर्षे आम्ही चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांशीदेखील अदबीने वागतो.'

तसेच 'एखादा कर्मचारी त्याच्या कामामध्ये कसूर करत असेल तर त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठीची एक प्रणाली असते. त्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडून अथवा सभागृहामध्ये आपला मुद्दा मांडून संबंधित कर्मचाऱ्याला शिक्षा दिली जाऊ शकते. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेणे हे अत्यंत चुकीचे आहे,' असे हेमंत रासने यांनी नमूद केलं.

याचबरोबर 'पालिका कर्मचाऱ्यांशी केलेला मुजोरपणा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समोर आला आहे. मात्र अशाच प्रकारचा मुजोरपणा आणि गुंडगिरी मतदारसंघात वाढलेली आहे. महिलांना कार्यालयामध्ये बोलून दमदाटी करण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीमध्ये जनता अशा लोकांचा समाचार घेईल,' अशी टीका रासने यांनी केली.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT