पुणे : गेल्या काही दिवसांत एकामागून एक महाराष्ट्रातील फायरब्रँड नेते आजारी पडले आहेत. अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती व्हावं लागलं आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत, भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यानंतर आता पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे.
मेधा कुलकर्णी या हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर अतिशय आक्रमकपणे भूमिका घेत असतात. पुण्यात त्यांनी आजवर अशा अनेक मुद्द्यांवरुन रान पेटवलं आहे. त्यामुळं केवळ पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांची ओळख आता हिंदुत्वासाठी लढणाऱ्या नेत्या अशी बनली आहे.
आज अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याची माहिती त्यांनीच स्वतः फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. कुलकर्णी यांनी म्हटलं की, "प्रकृती अस्वास्थ्यामुळं मी उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळं काही दिवस आपल्या संपर्कात नसेन, त्याबद्दल दिलगीर आहे. काही काम असल्यास आपण माझ्या कार्यालयाशी संपर्क करू शकता. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू" पण त्यांना नेमकं काय झालंय? हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वीच रुग्णलयात दाखल झाले आहेत. नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी ते अॅडमिट झाल्याची चर्चा होती. पण आजार गंभीर स्वरुपाचा असल्यानं पुढील चार महिने आपण सार्वजनिक जीवनात उपलब्ध नसू पण नंतर पुन्हा जोमानं काम करु अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
तसंच माजी खासदार नवनीत राणा या देखील काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झाल्या आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यााचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनाही उपचारांसाठी रुग्णलायत दाखल करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.