Pune Police Sarkarnama
पुणे

Pune Police on Womens Sefty: दर्शना पवार, सदाशिव पेठेतील घटनेनंतर पुणे पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी उचलले हे पाऊल

Pune : शहरात संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत ३१ गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई

सरकारनामा ब्यूरो

Pune Police on Womens Sefty: गेल्या सहा महिन्यांत शहरात संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत ३१ गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कायद्यांतर्गत २७७ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच, 'धोकादायक व्यक्ती' कायद्यांतर्गत २४ गुन्हेगारांची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी (३० जून) दिली.

गेल्या आठवड्यात एमपीएससीत राज्यात सहावी आलेल्या दर्शना पवार हत्याकांडाने राज्यात एकच खळबळ माजली होती. ही घटना ताजी असतानाच बुधवारी (२७ जून) सदाशिव पेठेत एका महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल हाय अलर्टवर आले आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या घटनांची गांभीर्याने दखल घेतली शाळा-महाविद्यालयांतील तसेच शालाबाह्य अल्पवयीन मुला-मुलींमध्ये समुपदेशन करण्यात येणार आहे.

यासाठी या तरुण तरुणींचे समुपदेशन करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलीस नोंदीनुसार १४ हजार ४०० लोकांवर विविध कलमांअंर्तगत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील १११ पोलिस चौक्या सीसीटीव्ही जोडण्यात येणार आहे. तसेच पोलिस चौक्याही दोन शिफ्टमध्ये सुरु राहणार आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी त्या पोलिस चौक्यांना अचानक भेटी देतील, असही रितेश कुमार यांनी यावेळी स्पष्ट केलं (Pune Police)

याशिवाय, जागतिक अमली पदार्थ दिनानिमित्त व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पुढील दोन महिन्यांत दहा लाख लोकांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट आहे. यात सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Pune girl Attack)

तसेच, पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत (Womens Sefty) पोलिसांकडून विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. जर महिलांना कोणी त्रास देत असल्यास त्यांनी न घाबरता पोलिसांत तक्रार द्यावी. तक्रार केल्यानंतर अनुचित घटना टाळणे शक्य होते. पण काहीजण भीती आणि बदनामीपोटी तक्रार करण्यास घाबरतात. त्यामुळे शाळा- महाविद्यालयांत तक्रार पेट्या बसविण्यात येणार आहेत. या तक्रारींची पोलिसांकडून तातडीने दखल घेतली जाईल आणि संबंधित तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवली जाईल,असेही पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT