Sharad Pawar on Buldhana Bus Accident: फक्त पाच लाख रुपये देऊन प्रश्न मिटणार नाही. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखायचे असतील तर, त्या विषयातील सखोल ज्ञान असलेल्या लोकाची टीम तयार करा, त्याच्याकडून या मार्गाचा आढावा घ्या, त्यांनी काही उपाययोजना सांगितल्या, जिथे दुरुस्ती करण्याची शक्यता असेल तिथे ती केली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला आहे.
ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यापासून या मार्गावर अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. (Buldhana Bus Accident)
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अपघात होत आहेत, या रस्त्याने जण्याचं मी ठरवलं. पण हा महामार्ग बनवताना त्याचं वैज्ञानिकदृष्ट्या नियोजन केलं नसावं, असं माझ्या लक्षात आलं. या महामार्ग बनवण्याची ज्यांची जबाबदारी होती, त्या लोकांना कळत नकळत दोषी ठरवलं जातं. पण जे झालं ते दुर्दैवीच आहे. २५ लोकांचा मृत्यू होतो. याच्याइतकं दुखं नाही. आम्ही एकच गोष्ट ऐकतोय अपघात झाला आणि शिंदे सरकारने (Shinde Govt) पाच लाख रुपये दिले, पण पाच लाख रुपये देऊन प्रश्न सुटणार नाही. या संदर्भात रस्त्यांच्या संबंधीच ज्ञान असलेली कर्तबगार लोक आहेत, त्यांची टीम तयार करावी, संपूर्ण रस्त्याची पाहणी करावी, जिथे चूक झालीये ती शोधून काढावी आणि पुन्हा असे अपघात होणार नाही, याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.