MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

MLA Ravindra Dhangekar: पैशांंचा पाऊस.. निकालानंतर धंगेकरांनी सांगितले निवडणूक काळातील 'ते' प्रसंग...

सरकारनामा ब्युरो

MLA Ravindra Dhangekar News : पैशांचा पाऊस पडत असतानाही मतांचा पाऊस पडला, म्हणजे पैसा हरला आणि जनता जिंकली, हे कालच्या निकालावरुन स्पष्ट झालं. अशा शब्दांत नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. निवडणुकीनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यानी त्यांच्या राजकीय प्रवासासह राजकारणातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

 भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयश्री खेचून आणत इतिहास घडवला आहे. धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे.  या विजयानंतर त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय कसब्यातील मतदारांना दिले. या विजयावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

ज्या पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया हाताळली गेली ती किळसवाणी होती. मी गिरीश बापट यांच्याविरोधात दोनदा विधानसभा निवडणूक लढवली,पण आम्हाला कधी शारिरीक किंवा मानसिक त्रास झाला नाही. पण यावेळी भाजपच्या वरिष्ठांनी या निवडणूकीत चूकीच्या पद्धतीने काम केलं. रस्त्या रस्त्यावर पैसे सापडत होते. पण जो समाजासाठी काम करतो जनता त्याला डोक्यावर घेते. पण ज्या पद्धतीने त्यांनी पापाच्या पैशाचा वापर केला आणि तो जनतेतून फिरवताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. म्हणजे उद्या जर कोणत्या कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची असेल तर भाजपचा क्रायटेरियाच हा असेल की हा किती पैशावाला आहे.

अत्यंत गलिच्छ राजकारण, म्हणजे लोकशाहीची हत्या करणं, गुंड पाठवणं, पोलीस यंत्रणा हाताशी धरणं, दबावतंत्राचा वापर करणं. सध्या तर एक फोन आला की ईडी सीबीआयच्या धाडी पडत आहेत. यामुळे लोक घाबरु लागले आहेत. पण मी लढणारा कार्यकर्ता आहे. आमदारकी खासदारकी हे माझ्यासाठी काही नाही. मी नागरिकांसाठी कार्यकर्ता आहे आणि मरेपर्यंत माझ्याकडून हे पद कोणीही काढून घेऊ शकत नाही. मी कोणालाही घाबरत नाही.असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT