chhagan bhujbal sharad pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar: अजितदादांनी दांडी मारलेल्या कार्यक्रमात मोठी घडामोड; पवारांचा 'तो' मेसेज भुजबळांनी गोपनीयतेनं वाचला VIDEO

Sharad Pawar And Chhagan Bhujbal Political News : छगन भुजबळ हे शुक्रवारी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले. कारण सकाळी सीएम देवेंद्र फडणवीस आणि सायंकाळी शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर दिसून आले. भुजबळ या माध्यमातून मंत्रिपदासाठी पत्ता कट करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा तर देत नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Deepak Kulkarni

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडात अजित पवारांना साथ दिलेल्या छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. यानंतर भुजबळांनी उघडउघड नाराजी व्यक्त करतानाच तीव्र संतापही व्यक्त केला होता. त्यांनी अजित पवारांवर जोरदार शा‍ब्दिक हल्लेही चढवले होते. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लवकरच मोठा निर्णय घेण्याच्याही तयारीत असल्याचे बोलले जात असतानाच चाकणमध्ये मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील चाकण येथे शुक्रवारी (ता.3) त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि मंत्री छगन भुजबळ हे दोन दिग्गज नेते उपस्थित होते.नाराज भुजबळ आणि शरद पवार हे एकत्र येत असल्यानं या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचेच लक्ष लागलेलं होतं.

चाकण येथील कार्यक्रमावेळी शरद पवार आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसल्याचे दिसून आले. त्याचवेळी शरद पवारांनी भुजबळांना पत्रिकेवर लिहन एक संदेश दिला.तो मेसेज भुजबळांनीही तितक्याच गोपनीयतेनं वाचल्याचंही पाहायला मिळालं.त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही क्षणांची चर्चा झाल्याचेही दिसून आले.यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हास्य रंगल्याचं पाहायला मिळालं.

क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा चाकण बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आला आहे.या कार्यक्रमातच शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोन नेते एकाच व्यासपीठावर दिसून आले. मात्र, मंचावर आल्यापासून दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहणं टाळल्याचं चित्र होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ हे चाकण येथील कार्यक्रमाला तब्बल दीड तास उशिरा आले. त्यामुळे त्यांच्याआधीच शरद पवारांना एवढा वेळ वाट पाहावी लागली. याचमुळे पवारांनी भुजबळांना चिमटा काढतानाच नाराजीही या मेसेजद्वारे व्यक्त केली असावी असा अंदाज उपस्थितांनी बांधला.

छगन भुजबळ हे शुक्रवारी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले. कारण सकाळी सीएम देवेंद्र फडणवीस आणि सायंकाळी शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर दिसून आले. भुजबळ या माध्यमातून मंत्रिपदासाठी पत्ता कट करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा तर देत नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT