Sharad Pawar Meet Chhagan Bhujbal : सीएम फडणवीसांनंतर आता भुजबळांचा शरद पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास; माजी आमदाराच्या घरी खलबतं

Ncp News : चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि माजी मंत्री भुजबळ हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले.
Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Chhagan Bhujbal, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मंत्रीपद मिळाले नसल्याने मंत्री छगन भुजबळ हे नाराज आहेत. ते लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरु असतानाच शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. यावेळी या दोन नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यानंतर माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली असल्याचे समजते.

चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मंत्री भुजबळ हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. त्यावेळी भुजबळ आणि शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. छगन भुजबळ हे शरद पवारांच्या पाया देखील पडले. त्यानंतर माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा देखील झाली. भुजबळ आणि शरद पवार यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Santosh Deshmukh Murder Case : घुले, आंधळे अन् सांगळे 'वाँटेड'; पोलिस चप्पा चप्पा छान रही है!

छगन भुजबळ परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर ही भेट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) दुसऱ्यांदा पवारांना भेटले, या आधी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेण्यासाठी ते गेले होते. त्यांनतर आज दोघांची चाकण येथील कार्यक्रमानिमित्त भेट झाली आहे.

Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Ajit Pawar Decision : बीडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; मुंबईत दाखल होताच अजित पवार घेणार निर्णय

दरम्यान, शुक्रवारीच छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट झाली आहे. शरद पवारांना भेटण्यापूर्वी भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. साताऱ्याच्या नायगावमध्ये फडणवीस आणि भुजबळ यांनी एकत्र प्रवास केला. त्यामुळे भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे, त्यातच आता छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रवास देखील केला त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Chhagan Bhujbal, Sharad Pawar
BJP Leader Claims : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते आमच्याकडे येण्यासाठी नंबर लावून बसलेत; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com