Ajit Pawar Passed Away Sarkarnama
पुणे

Ajit Pawar accident Zero FIR : अजितदादांच्या अपघातप्रकरणी बेंगलुरूत झिरो 'एफआयआर'; महाराष्ट्रात तपास करावाच लागणार, SP ठरविणार दिशा...

Maharashtra police investigation Ajit Pawar accident : अजित पवार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! बेंगलुरूत झिरो FIR दाखल, पुढील तपास महाराष्ट्र पोलिसांकडे जाण्याची शक्यता. SP लवकरच निर्णय घेणार.

Sudesh Mitkar

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी बंगळुरू (कर्नाटक) पोलिसांनी ‘झिरो एफआयआर’ दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी आता महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र पोलीस गुन्हा दाखल करून घेणार का? आणि पुढची प्रक्रिया कशी असणार याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे.

काय आहे एफआयआर मध्ये

कर्नाटकातील बेंगळुरू येथे नोंदवलेल्या ‘झिरो एफआयआर’मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीत रोहित पवार यांनी अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

FIR मध्ये खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करणे यासारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे.

तक्रारीत विमानाच्या सुरक्षितता नियमांचे उल्लंघन, कमी दृश्यता असतानाही लँडिंगला परवानगी देणे, विमान वापराच्या तासांमधील विसंगती, पायलट बदल आणि पायलटच्या शिस्तभंगाच्या इतिहासाबाबतही आरोप आहेत. अपघात हा केवळ दुर्घटना नसून गंभीर निष्काळजीपणा आणि गैरव्यवहारामुळे घडला असू शकतो, अशी मागणी सखोल तपासाची करण्यात आली आहे.

काय म्हटले पत्रात

कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या महासंचालकांना पत्र पाठवले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकारक्षेत्राच्या मुद्द्यावरून हा ‘झिरो एफआयआर’ बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्याची विनंती कर्नाटक पोलिसांनी या पत्राद्वारे केली आहे.

आता महाराष्ट्र पोलीस नेमकं काय करणार ?

याबाबत माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे म्हणाले, एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जर झिरो नंबरने गुन्हा दाखल झाला तर ते पोलीस स्टेशन ऑनलाइन स्वरूपात तो गुन्हा घडलेल्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला वर्ग करत असते. यासाठी राज्य सरकार अथवा कोणत्याही वरिष्ठ यंत्रणेची परवानगी लागत नाही तो गुन्हा थेट वर्ग होतो.

हा गुन्हा वर्ग झाल्यानंतर जर त्या गुन्ह्यांमध्ये दखलपात्र मुद्दे असतील तर गुन्हा वर्ग झालेल्या पोलीस स्टेशनला त्यामध्ये तपास करणे बंधनकारक असते. याबाबतचे आदेश सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश या खटल्यामध्ये दिला आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये तपास करावाच लागणार असून तपासाच्या अंती येणाऱ्या निष्कर्षानुसार संबंधित एसपींना तो गुन्हा फायनल करायचा का? नाही याबाबतचे अधिकार असणार आहेत.त्यामुळे या गुन्हा मध्ये पुढील सूत्र ग्रामीण एसपीच्या हाती असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT