Crime News : नाशिकची घटना ताजी असतानाच आता अंधश्रद्धेचा अजून एक भयानक प्रकार समोर! मुलीच्या लग्नाचा 'दोष' काढण्याच्या बहाण्याने बोलवून घेतलं अन्

shocking superstition case after : नाशिकमधील घटनेनंतर महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
AI Image fake godman Photo
AI Image fake godman PhotoSarkarnama
Published on
Updated on

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत असतानाच आता अंधश्रद्धेच्या नावाखाली घडलेल्या आणखी दोन धक्कादायक प्रकार समोर आल्या आहे. राज्यात विविध भागात अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत आहे. अशा फसवणुकीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत.

अजूनही समाजातून भोंदूगिरीचा विळखा कमी झालेला नाही, आणि त्याचे धक्कादायक उदाहरण सतत समोर येत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा भोंदू बाबांच्या कारवायांबाबत चिंता व्यक्त होत आहे.

AI Image fake godman Photo
Crime News : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल समोर; 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; पोलिसांची मोठी कारवाई!

नांदेडमध्ये एका भोंदू महाराजाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. आणि डोंबिवलीतील एका वयोवृद्ध व्यक्तीला आपल्या मुलीच्या लग्नात अडथळे येत असल्याची चिंता होती. या समस्येवर उपाय शोधत असताना त्यांची ओळख दीपक सावंत या व्यक्तीशी झाली. त्याने स्वतःला आध्यात्मिक शक्ती असलेला बाबा असल्याचे भासवून विशेष पूजाविधी करून मुलीच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचे आश्वासन दिले.

विश्वास संपादन केल्यानंतर त्याने विधी करण्यासाठी काही मौल्यवान वस्तूंची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार त्या व्यक्तीकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मी नाणी घेतली. विधी सुरू असताना त्याने हे दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवायला सांगितले. मात्र, याच वेळी त्याने अत्यंत चलाखीने रुमालाची अदलाबदल केली आणि बनावट रुमाल परत देत मूळ दागिने स्वतःजवळ ठेवले.

AI Image fake godman Photo
Government Decision on Mobile Recharge : रिचार्ज टेन्शन मिटणार! राघव चड्ढांच्या मागणीनंतर 30 दिवसांच्या प्लॅनबाबत सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय!

विधी पूर्ण झाल्याचे सांगून तो तेथून निघून गेला. काही वेळानंतर रुमाल उघडून पाहिल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला आणि आरोपी दीपक सावंत याला कल्याण परिसरातून अटक केली. प्राथमिक चौकशीत त्याने अशाच प्रकारे इतर लोकांनाही फसवल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com