Pune ZP Ajit Pawar.jpg Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News: नियतीचा खेळ..! एकीकडे अजितदादांच्या मृत्यूला दोन महिने पूर्ण, त्याचदिवशी पुणे झेडपी राज्यात ठरली 'नंबर वन'

Pune ZP News: अजितदादांच्या निधनाला शनिवारी(ता.28 मार्च) दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्याचदिवशी पुणे जिल्हा परिषद राज्यात 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत एक नंबर आली आहे. यावरुनच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

Deepak Kulkarni

Pune News: नियतीचा विचित्र योगायोग...राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ऐन जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावरच बारामती विमान दुर्घटनेत अकाली मृत्यू झाला होता. अजितदादांच्या निधनाला शनिवारी(ता.28 मार्च) दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्याचदिवशी पुणे जिल्हा परिषद राज्यात 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत एक नंबर आली आहे. यावरुनच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

अजितदादांच्या निधनानंतर प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट झेडपी अन् पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परिषदेच्या 73 गटांपैकी विक्रमी 51 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली, तर 13 पंचायत समित्यांपैकी राष्ट्रवादीनं 8 पंचायत समित्या जिंकून जिल्हाही ताब्यात ठेवल्याचं दिसून आलं होतं. पण अजितदादांचं नेहमीच बारकाईनं लक्ष राहिलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या बाबतीत आता एक विचित्र योगायोग जुळून आल्याचं समोर आलं आहे.

गेल्यावेळी राज्यात पुणे जिल्हा परिषद दोन नंबरला आली होती. तेव्हा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO गजानन पाटील हे त्यांच्या ZP टीम सोबत अजितदादा यांना भेटायला गेले होते..तेव्हा अजितदादा सीईओ यांना म्हणाले होते की, "गजानन पुढच्यावेळी आपला पुणे जिल्हा एक नंबर हवा असं संबंधित पोस्टमध्ये

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO गजानन पाटील यांनी आता दादा पुणे जिल्हा परिषद राज्यात एक नंबर आलीय असं म्हटलं आहे. पण हे पहायला दादा तुम्ही नाहीत..दादांना जाऊन दोन महिने झाल्याचं सांगत एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. याचवेळी अजितदादा म्हणजे एक सिस्टीम होती..ती सिस्टीम जी अविरत चालायची असंही नमूद भैय्या पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.28 मार्च) सह्याद्री अतिथीगृह येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. त्यात सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना गौरवण्यात आले.

योगायोग म्हणजे ज्यादिवशी अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याचदिवशी पुणे जिल्हा परिषद राज्यात 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत एक नंबर आली आहे. यावरुनच पुणे झेडपीचे सीईओ गजानन पाटील यांनी भावनिक पोस्ट केली आहे. दोन महिन्यांपूर्वी बारामतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चौघांचं एका विमान अपघातात निधन झालं. लियरजेच 45 हे विमान कोसळून हा अपघात झाला होता.

अजित पवार हे यांचा त्यांच्या कार्यकाळात कायमच प्रशासनावर जबरदस्त वचक राहिला आहे. त्यांच्या वक्तशीरपणा आणि शिस्तीमुळे अधिकारीही नेहमीच 'अलर्ट' मोडवर राहत होते. ते कधीच शासकीय कामातला हलगर्जीपणा खपवून घेत नसत. त्या त्या ठिकाणी अजित पवारांनी संबंधित अधिकारी,कंत्राटदारांची झाडाझडती घेतल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. पण याच अजितदादांच्या अचानक जाण्यानं कडक शिस्तीचा नेता गमावल्याचं आजही राजकीय वर्तुळासह प्रशासनातही बोललं जातं.

अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची सहानुभूतीची लाट प्रत्यक्ष मतदानात दिसून आली. बारामती, इंदापूर, आंबेगाव, मुळशी, वेल्हा, पुरंदर, शिरूर, मावळ या पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. दौंड, इंदापूर, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, मावळ या भागांत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे तसेच भाजपला बसलेल्या फटक्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर सलग चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT