

IAS M. Devendra Singh : सनदी अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्या पुनर्नियुक्तीवरून सुरू झालेल्या मुख्यमंत्री कार्यालय विरुद्ध पर्यावरण विभाग वादात अखेर मुंडे यांची सरशी झाली आहे. एम. देवेंद्र सिंह यांना आता मुंबई महापालिकेत सहआयुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे आहे. तर राहुल रेखवार यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.
एम. देवेंद्र सिंह यांचे काही दिवसांपूर्वीच निलंबन मागे घेतले होते. पण त्यांच्या पुनर्नियुक्तीवरून राजकीय वादाला सुरुवात झाली होती. त्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळावर सदस्य सचिव या पदावरील पुनर्नियुक्तीस पर्यावरण विभागाचा विरोध होता. मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुनर्नियुक्तीसाठी आग्रही होते, पण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधामुळे एम. देवेंद्र सिंह पुनर्नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणासंबंधित एका प्रश्नाचे ब्रिफिंग मंत्री पंकजा मुंडे यांना दिले नाही. तसेच त्यावेळी एम. देवेंद्र सिंह उपस्थितही राहिले नाहीत, असा ठपका ठेवत विधानसभेचे तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची दखल घेऊन शासनाने तातडीने निलंबनाची कार्यवाही केली.
मात्र एम. देवेंद्र सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे निलंबन मागे घेण्याचे निर्देश दिले. निलंबन मागे घेतल्यानंतर मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून त्यांची पुनर्नियुक्ती करण्यास पर्यावरण विभागाने विरोध केला होता. त्यामुळे ते अद्याप पुनर्नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. या विरोधाला राजकीय वादाची किनार असल्याची चर्चा होती.
कोण आहेत एम. देवेंद्र सिंह?
देवेंद्र सिंह 2011 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. यापूर्वी 3 वर्षे ते रत्नागिरीचे जिल्हाधिकारी होते. तत्कालीन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात टोकाचे मतभेद झाले होते. त्यानंतर एम. देवेंद्र सिंह यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यातही टोकाचे मतभेद झाल्यानंतर राहुल रेखावार यांची नियुक्ती झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.