Ajit Pawar News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला तर महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या. कांदा उत्पादक भागात महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे दिसले. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्याची किंमत आम्हाला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोजावी लागली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार Ajit Pawar म्हणाले, आम्ही दिल्लीत असताना पियुष गोयल, अमित भाई, वरिष्ठांना जो काही फटका बसला, कांदा शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या विषयी सांगितले. उत्पादक आणि ग्राहक दोघांना परवडायला हवं. या दोघांमध्ये समन्वय हवा, अशी आमची सारखी मागणी होती. त्यांनी सगळ्यांनी देखील गांभीर्याने घेतले आहे.
आपण पाहिलं तर जळगाव, रावेरची जागा सोडली तर तेथील सगळ्या जागेवर फटका बसला. कांदा उत्पादक नाशिक, नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात आहेत, असे देखील अजित पवारांनी सांगितले.
राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराजी असल्याची चर्चा होती. मात्र, भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. भुजबळ यांनीच स्वःता सांगितले की ते नाराज नाहीत. राज्यसभेचा उमेदवाराचे नाव पार्लमेंटरी बोर्डाने निश्चित केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीचे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील अमोल काळे यांचे निधन झाले होते. त्यामुळे दु:खात असताना फाॅर्म भरायला बोलवणं मला योग्य वाटलं नाही. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना देखील सांगूनच उमेदवारी फाॅर्म भरल्याचे अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.