Ajit pawar, Pradnya Satav
Ajit pawar, Pradnya Satav  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News: प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यानंतर अजित पवार संतापले; शिंदे,फडणवीसांना म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar On Pradnya Satav Attack : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात हल्ला करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आधी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला आणि आता सातव यांच्यावर हल्ला झाल्यामुळे राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

याचदरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या हल्ल्याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे.

अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. पवार म्हणाले,दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्ला झाला होता. त्यानंतर आता प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. सातव यांना संरक्षण दिले पाहिजे. तसेच या घटनेमागील मास्टरमाईंड शोधून काढला पाहिजे. त्याला कडक शासन झाले पाहिजे अशी रोखठोक भूमिका अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडली आहे.

तसेच राजीव सातव यांनी आमदार, खासदार म्हणून चांगले काम केलं. त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) या आमदार म्हणून काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्ला झाला होता. त्यानंतर काल प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असून प्रत्येकाचं संरक्षण करणं ही राज्य सरकार आणि पोलिसांची जबाबदारी असते. या घटनेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी अजित पवार यांनी केली.

''या अगोदरही हल्ला, पण त्यावेळी मी सिरीयसली...''

मागील नोव्हेंबरमध्ये आम्ही भारत जोडो यात्रेची तयारी करत होतो, त्यावेळी पेडगावमध्ये एके दिवशी दुपारी चारच्या सुमारास माझ्यावर पहिल्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी मी काही जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. त्यानंतर बुधवारी दुसऱ्यांदा कसबे धावंडा या गावी माझ्यावर हल्ला झाला. त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही, या भूमिकेतून मी पोलिसांत तक्रार दिली आहे.

'' तो हल्ला मला करायला लावला..''

प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आऱोपीला काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनं मोठी कबुली दिली आहे. हा हल्ला मी स्वतःहून केलेला नसून मला तो करायला लावला आहे अशी माहिती आऱोपींनी पोलिसांनी दिली असल्याचं सातव यांनी सांगितलं आहे.

तसेच पोलीस तपासाबाबत आताच समाधान व्यक्त करता येणार नाही. कारण, पकडण्यात आलेला व्यक्ती या प्रकरणामागे कोण आहे, हे सांगत नाही. त्याचं नाव सांगण्यास तो घाबरत आहे. त्यामुळे या हल्लामागील सूत्रधाराचे नाव समोर येत नाही तोपर्यंत आम्ही समाधान व्यक्त करू शकत नाही असेही सातव यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT