Kalyan News: धक्कादायक : हवालदाराने केली रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाची हत्या ; आणखी तिघांच्या हत्येचा होता डाव....

Kalyan Railway Police : पहाटे 4 वाजता यादव याला अटक करण्यात आली आहे.
Kalyan Railway Police
Kalyan Railway Policesarkarnama
Published on
Updated on

Kalyan Crime News : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. हवालदाराने एका रेल्वे पोलीस उपनिरीक्षकांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्या हवालदाराला पेण येथून अटक करण्यात आली आहे. बसवराज गर्ग असे हत्या झालेत्या उपनिरिक्षकाचे नाव आहे. हवालदार पंकज यादव (वय 30) याला पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली.

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गर्ग यांच्या हत्येप्रकरणी फिर्याद दाखल केली. यावरुन पोलिसांनी आरोपी यादव याचा शोध सूरु केला. तो चिपळूण येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एक पथक तात्काळ चिपळूण येथे रवाना झाले.

यादव हा पेण येथे बॅरेक मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी पेण येथून यादव याला अटक केल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. पहाटे 4 वाजता यादव याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेशकुमार त्रिपाठी यांनी तक्रार दिली होती.

Kalyan Railway Police
PM Narendra Modi : भाजपच्या खासदारांना व्हीप ; '13 फेब्रुवारीपर्यंत.."

बसवराज गर्ग हे अंबरनाथ रेल्वे स्थानकात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. हवालदार पंकज यादव याने लाकडी दांडक्याने मारहाण करत गर्ग यांची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. बॅरेक मध्ये इतर पोलीस कर्मचारी उपस्थित असताना ही हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली. हत्या करून यादव याने तेथून पळ काढला.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी 4 तासात हवालदार यादव याला पेण येथून अटक केली आहे. गर्ग यांच्या हत्येनंतर तिघांच्या हत्येचा पंकज याचा डाव होता. तो डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.

Kalyan Railway Police
NCP News: भुजबळांना 26 महिने तर विरोध करणाऱ्याला 30 महिने शिक्षा!

बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास त्रिपाठी हे धुतलेले कपडे काढण्यासाठी बॅरेक मधून बाहेर आले होते. यावेळी गर्ग हे बॅरेक मध्ये आराम करत बिछान्यावर पडले होते. यादरम्यान एक व्यक्ती बॅरेक मध्ये शिरल्याचे त्रिपाठी यांनी पाहिले. दरम्यान बॅरेक मधून ओरडण्याचा आवाज आल्याने त्रिपाठी यांनी आत जाऊन पाहिले तर बसवराज हे जमिनीवर पडलेले दिसले.

त्रिपाठी यांनी बाहेर येत आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांना आवाज देत बोलावले.यादव याने घटनास्थळावरून पळ काढला. सहकाऱ्यांनी गर्ग यांना उपचारासाठी कल्याण येथील मध्य रेल्वे रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी गर्ग यांना मयत घोषित केले.

Kalyan Railway Police
Pradnya Satav Attack : मी स्वतःहून हल्ला केला नाही; मला करायला लावला : हल्लेखोराने कबुली दिल्याचा सातव यांचा दावा

पोलिसांनी डाव उधळला

यादव हे 2019 मध्ये कल्याण येथे कार्यरत होते. यावेळी आरोपी यादव आणि त्याचे काही सहकारी या दोघांत भांडण झाले असताना त्याची चौकशी गर्ग यांनी केली होती आणि त्यात त्याला 4 वर्षाची पदोन्नती व पगारवाढ ही कमी करण्यात आली होती. याचा राग यादव याला होता. या चौकशीत गर्ग यांच्या व्यतिरिक्त इन्स्पेक्टर बर्वे, माने आणि हवालदार घरत यांनीही याची चार्जशीट बनविण्यासाठी मदत केली होती. त्या तिघांचा ही राग यादव याला होता. गर्ग यांची हत्या केल्यानंतर बर्वे, माने व घरत या तिघांनाही संपविण्याचा डाव यादव याने रचला होता. पोलिसांनी हा सर्व डाव उधळून लावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com