Ajit Pawar Sarkarnama
पुणे

अजितदादांची मोठी घोषणा : १ डिसेंबरपासून पुणे संपुर्ण अनलॉक

पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार बोलत होते.

सरकारनामा ब्युरो

पुणे : मागच्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे ही अतिशय दिलासादायक बाब आहे. तसेच आता १ डिसेंबर पासून जिल्ह्यातील शाळा देखील सुरु होत आहेत. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करत संपुर्ण अनलॉक करत असल्याची महत्वपुर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

अजित पवार यांनी यावेळी नव्या व्हेरिऐंटसाठी सज्ज असून त्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंडवडमधील जंम्बो कोविड रूग्णालय सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहितीही दिली. त्याबाबत पुढील आढावा ३१ डिसेंबर रोजी त्यावेळी व्हेरिऐंटची परिस्थिती बघून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे. शाळा सुरु आहेत. त्यामुळे गायन आणि इतर कार्यक्रमांना देण्यात आलेली ५० टक्के उपस्थितीची मर्यादा आता शिथिल करण्यात आली आहे. पुणे आता पुर्णपणे अनलॉक करण्यात येत आहे. तसेच डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या भीमथडी जत्रेलादेखील परवानगी देण्याचा निर्णय एकमताने आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करण्यात आली असली आणि जत्रेला परवानगी देण्यात आली असली तरी, या ठिकाणी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे, लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच पुण्यात यापुढे विमानाने देशांतर्गत प्रवास करुन आल्यानंतर दोन डोस घेतलेल्यांना कोणतेही निर्बंध नसल्याची माहिती त्यांनी दिली.

अजित पवार यांनी यावेळी पुणे मेट्रोच्या कामाचाही सविस्तर आढावाही घेतला. सोबतच पुणे विद्यापीठ चौकात करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचाही पवार यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी काम करत असताना पुणेकरांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे, मात्र हे काम झाल्यानंतर पुढच्या ५० वर्षाची काळजी मिटेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT