Ajit Pawar Baramati Rally Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Baramati Rally : 'पक्ष चोरला नाही, रितसर मिळाला'; अजितदादांचा बारामतीत एल्गार...

Chetan Zadpe

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बालेकिल्ल्यात आज सभा घेत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी त्यांनी आगामी निवडणुकांविषयी भाष्य करतानाच, नुकतंच विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयावरही भाष्य केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेताच अप्रत्यक्षपणे टीका केली. (Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले, "आमच्यावर आरोप केला जातो की आम्ही पक्ष चोरला, पण पक्ष आम्हाला रितसर-कायदेशीर मार्गाने मिळाला आहे. काल, आज आणि उद्याही आम्ही राष्ट्रवादी आहोत, आम्ही पक्ष चोरला नाही. माझा परिवार सोडला तर इतर सर्व घरांतील विरोधात प्रचार करतील. मला कुटुंबातील एकटे पाडण्याचा प्रयत्न करतील, पण आपल्याला राष्ट्र्वादी काँग्रेसला विजयी करायचं आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार (AJit Pawar) म्हणाले, "आठ लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या सर्व मुलींना आता मोफत शिक्षण मिळणार, असा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रामधील अनेक अध्यक्ष आमच्या बरोबर आले आहेत. काम करणाऱ्यावरच रोज आरोप केले जातात. माझा दावा तर असा आहे की, बारामती तालुक्यात जेवढी कामे सुरू आहेत तेवढी इतर ठिकाणी सुरू नाहीत." (Ajit Pawar Baramati Rally News)

"मी नुसते सेल्फी काढत फिरत नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काळात आम्ही एकत्र येऊ हे तुम्ही मनात आणू नका. तुम्हाला रोज फोन येतील. येत्या निवडणुकांमध्ये जर काही डाग लागला तर माझी राजकारणातील किंमत कमी होईल. नुसतं संसदेत भाषण करून विकास होत नाही. तुमची साथ आहे तोपर्यंत माझे काम वेगात सुरू राहील. काही लोकं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत, असे अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT