Ajit Pawar Vehicle Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : 'कॉमन मॅन'साठी नियम, दंड सर्व काही, उलट्या दिशेने जाणाऱ्या अजितदादांना मात्र चक्क सूट; दिमतीला पोलिसही

Lok Sabha Election 2024 : स्पष्टोक्ता, सडेतोड, खटक्यावर बोट ठेवून समस्यांवर तोडगा काढणारे, प्रशासनावर वचक ठेवणारे आणि नियमबाह्य काम न करणारे, अशी प्रतिमा असणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याने आज चक्क वाहतुकीचे नियम तोडले.

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : स्पष्टोक्ता, सडेतोड, खटक्यावर बोट ठेवून समस्यांवर तोडगा काढणारे, प्रशासनावर वचक ठेवणारे आणि नियमबाह्य काम न करणारे अशी प्रतिमा असणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या Ajit Pawar ताफ्याने आज चक्क वाहतुकीचे नियम तोडले. हा ताफा थेट उलट्या दिशेने गेल्याने इतर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. या वेळी त्यांचा चालकही फोनवर बोलतही असल्याचे दिसते. या उलट्या जाणाऱ्या ताफ्याला पोलिसांनीच रस्ता मोकळा करून दिल्या सामान्य लोकांत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. Ajit Pawar Break rules of traffic in Pune.

पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol तसेच शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार गुरुवारी (ता. 25) जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. या वेळी काही वेळ ते जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून पुन्हा बाहेर पडले. तेथून निघताना त्यांचा वाहनांचा ताफा हा उलट्या दिशेने गेला. आश्चर्य म्हणजे तेथे वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना टोकलेसुद्धा नाही. उलट त्यांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी मदत केली. याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

ऐरवी सामान्य लोकांसाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी पोलिस दक्ष असतात. ट्रिपल सीट प्रवास करणे, झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे असे प्रकार निदर्शनास आल्यास पोलिस दंड ठोकल्याशिवाय राहत नाहीत. उलट्या दिशेने प्रवास करणारे कोणी सापडले तर त्याची खैर नसते. दंड तर वसूल केला जातोच, तर अपघात होण्याची शक्यता असल्याने चार शेलके शब्दही सुनावले जातात. मात्र नेत्यांना यातून सूट दिली का, नेते मंडळींना नियम मोडण्यासाठी पोलिस सहकार्य कसे काय करू शकतात, असे प्रश्न अजित पवारांच्या ताफ्याने उलट्या दिशेने प्रवास केल्यानंतर उपस्थित केले जात आहेत. यावर आता प्रशासनाकडून काय कारवाई केली जाणार, याकडे लोकांचे लक्ष आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ, तर शिरूरचे उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले. दोन्ही लोकसभा महायुतीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या जागा जिंकून आणण्यासाठी महायुतीचे नेते जोरदारपणे कामाला लागल्याचे दिसून येत आहे. या जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT