Dharashiv Lok Sabha News : तुळजापूर मुक्कामी शरद पवारांचा प्लॅन ठरला; 'या' नेत्याने घेतली गुप्तभेट?

Maharashtra Political News : तुळजापूर येथे धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.
Omraje nimbalkar, Sharad pawar
Omraje nimbalkar, Sharad pawar Sarkarnama

Dharashiv Political News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे धाराशिवशी वेगळे नाते आहे. हे नाते त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपले आहे. कुठलेही मोठे आंदोलन अथवा प्रचाराची सुरुवात त्यांनी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातूनच करत आले आहेत. हे वेगळेपण त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपत येथील जनतेशी नाळ जोडून ठेवली आहे.

गेल्या पाच वर्षांत त्यांना अनेक धक्के बसले. धाराशिव जिल्ह्यातील त्यांचे जवळचे नातेवाईक डॉ. पदमसिंह पाटील व त्यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांनी ऐन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला.

तर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक जवळच्या मंडळींनी त्यांची साथ सोडली. त्यानंतरही शरद पवार खंबीरपणे उभे असून, लोकसभा निवडणूक प्रचारात ते हिरिरीने सहभागी झाले आहेत.

Omraje nimbalkar, Sharad pawar
Chhagan Bhujbal News : 'शिरूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन...', अमोल कोल्हेंच्या दाव्यावर छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

तुळजापूर येथे धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी त्यांनी पदमसिंह पाटील व त्यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांच्या घरात गेल्या ३० वर्षांपासून अधिक काळ मंत्रिपद दिले. त्या माध्यमातून ते मागासलेल्या धाराशिव जिल्ह्याचा विकास करतील अशी आशा होती. मात्र, त्यांनी मुंबईतील नेरुळमध्ये मोठे बस्तान बसवले, अशी टीका केली.

त्यानंतर त्यांनी बुधवारी तुळजापूर येथे मुक्काम करीत धाराशिव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना विजय सोपा जावा यासाठी प्लॅन ठरवला आहे. शरद पवार यांनी या मुक्कामावेळी धाराशिव जिल्ह्यात जुन्या सहकाऱ्यांची जमवा-जमव करीत त्यांना कानमंत्र दिला. या वेळी तुळजापूर तालुक्यातील शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'या' नेत्याने घेतली गुप्तभेट

या प्रसंगी धाराशिव येथील साखर कारखानदार अरविंद गोरे यांनी घेतली शरद पवार (Sharad Pawar) यांची तुळजापूर येथे भेट घेतली. या दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे अरविंद गोरे हे चेअरमन आहेत. त्यांच्याशिवाय अनेक नेतेमंडळींनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या वेळी पवार यांनी रणनीती ठरवत नेते मंडळींशी चर्चा केली.

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सभेला गैरहजर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर येथील शरद पवार यांच्या प्रचार सभेला गैरहजर राहिले. चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मधुकरराव चव्हाण या सभेला गैरहजर असल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

R

Omraje nimbalkar, Sharad pawar
Sharad Pawar NCP Manifesto 2024: स्पर्धा परीक्षांची फी माफ करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'गॅरंटी'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com