Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Latest News : लोकसभेच्या निकालापूर्वी दादांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक

Sudesh Mitkar

Pune loksabha News : महाराष्ट्रातील सर्व लोकसभांच्या जागेवरती मतदान झाले असून चार जूनला मतमोजणी असणार आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून चार जागांवरती उमेदवार देण्यात आले होते. यातील बारामती, शिरूर आणि रायगड लोकसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात आहेत.

मतदानानंतर नेमकं या मतदारसंघांमध्ये काय चित्र असू शकतं याबाबतचा अंदाज पक्षाकडून घेण्यात आला असून निकालानंतर नेमकी पक्षाची भूमिका काय असणार यासारख्या विषयावरती चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत गरवारे क्लब हाऊस मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

या बैठकीला मंत्री, आजी, माजी खासदार, आमदार, २०२४ चे लोकसभा उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे राज्यप्रमुख, प्रवक्ते, पॅरंट बॉडी जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला व युवक जिल्हाध्यक्ष, युवती विभागीय अध्यक्ष व समन्वयक आणि मुंबई विभागीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात येणाऱ्या या बैठकीमध्ये पवार हे पक्ष संघटने बाबत नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT