Pune Car Accident News: पुणे अपघातप्रकरणी आरोपीवर पुढील खटला कसा चालवणार? आयुक्तांनी स्पष्टचं सांगितलं

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर मध्ये भरधाव कारने दोघांना चिरडून जीव घेतल्याचा गुन्हा भयावह असल्यामुळे अल्पवयीन आरोपीवर खटला चालवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी बालहक्क न्याय मंडळाकडे केली होती.
Pune Police Commissioner Amitesh Kumar
Pune Police Commissioner Amitesh KumarSarkarnama

Pune Porshe Accident : पुण्यातील'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी बालहक्क न्याय मंडळाने (Child Rights Justice Board) अल्पवयीन मुलाला या अगोदर दिलेला जामीन रद्द करत त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता आरोपी वेदांत अगरवालला (Vedant Agarwal) 14 दिवस बालसुधारगृहात राहावे लागणार आहे.

तर कल्याणीनगर (Kalyaninagar) मध्ये भरधाव कारने दोघांना चिरडून जीव घेतल्याचा गुन्हा भयावह असल्यामुळे अल्पवयीन आरोपीवर खटला चालवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी बालहक्क न्याय मंडळाकडे केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अल्पवयीन आरोपीची 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्याचा निर्णय दिला. मात्र आरोपी सज्ञान आहे की अज्ञान हे पोलिस तपासानंतर ठरवलं जाईल, असंही न्यायालयाने सांगितलं आहे. (Pune Porsche Car Accident)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे सध्या बालसुधारगृहात पाठवलेल्या आरोपीला पोलिस पौढ म्हणून घोषित करणार की त्याच्यावर अल्पवयीन म्हणूनच पुढील कारवाई केली जाणार याबाबतच्या अनेक चर्चा सुरु आहेत. याच संदर्भात पुणे पोलिस (Pune Police) आयुक्त अमितेश कुमार (Commissioner Amitesh Kumar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय पुढील तपासाची दिशी काय असणार आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, पुणे हिट 'हिट अँड रन' प्रकरणी आम्ही न्यायालयाकडे दोन अर्ज केले होते. मात्र, ते अर्ज रविवारच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने फेटाळून लावले.

परंतु, आम्हाला यश मिळालं आहे. त्यापैकी पहिलं यश म्हणजे आरोपीला देण्यात आलेल्या जामीनात सुधारणा करण्यात आली असून त्याला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात (Juvenile Detention Center) पाठवण्यात आलं आहे. तसेच आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवला जावा, असाही अर्ज आम्ही केला होता. तो अर्ज आता न्यायालयाने विचाराधीन घेतला आहे. यावर येत्या 24 मे रोजी सुनावणी होणार आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून एक मजबूत खटला दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील कल्याणीनगर (Pune Kalyaninagar) परिसरात भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दोघांना उडवलं, या घटनेत दोन इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे न्यायालयाने काही तासांतच जामीन मंजूर केल्यामुळे हे प्रकरण वादग्रस्त ठरलं होतं. आरोपीला जामीन देण्याच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे खुद्द गृहमंत्र्यांनी पुण्यात येऊन या प्रकरणासंद्रभात पत्रकार परिषद घेतली.

Pune Police Commissioner Amitesh Kumar
Pune Hit and Run Case : आता पोलीस अपघातग्रस्त 'Porsche'च्या कॅमेऱ्यातील चित्रीकरणही तपासणार!

त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी (Pune Police) मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.तर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल हा फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला तर आरोपीच्या छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आणि काल न्यायालयाने विशाल अगरवाल याच्यासह दोघांना 24 तारखेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com