Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात हिंजवडीसह 'या' शहरांसाठी 3 नव्या महानगरपालिका होणार, अजितदादांची मोठी घोषणा

New Municipal Corporations in Pune : महारपालिका केल्याशिवाय निधी आणि बाकीच्या सोयीसुविधा मिळत नाहीत. महापालिकेला वर्ल्ड बँकचे पैसे तसेच केंद्राचा निधी आणता येतो. माझा निर्णय काहींना आवडणार नाही. मात्र, काळानुसार निर्णय घ्यावे लागतात, असं अजित पवार म्हणाले.

Jagdish Patil

Pune News, 08 Aug : उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.08) पहाटेच्या सुमारास चाकण चौक परिसराची पाहणी केली. या भागात नागरिकांना वाहतूक कोंडींचा प्रचंड त्रास सहण करावा लागतो. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावर तर नागरिकांना सतत वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो.

याच सर्व समस्यांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आज चाकणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीसह इतर समस्या सोडवण्यासाठी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका करावी लागणार आहे, असं वक्तव्य केलं आहे. तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण या सर्व परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागेल, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.

महारपालिका केल्याशिवाय निधी आणि बाकीच्या सोयीसुविधा मिळत नाहीत. महापालिकेला वर्ल्ड बँकचे पैसे तसेच केंद्राचा निधी आणता येतो. माझा निर्णय काहींना आवडणार नाही. मात्र, काळानुसार निर्णय घ्यावे लागतात, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुंबई, मीरा-भाईंदर महापालिकेचं उदाहरणं दिलं. ते म्हणाले, काही जिल्ह्यांमध्ये नव्या महापालिका आल्या. ठाणे महानगरपालिका एकटी होती, त्यानंतर मुंबई महानगरपालिका झाली. मीरा भाईंदर आणि उल्हासनगर महानगरपालिका झाली. त्यामुळे तिथे पूर्वीपेक्षा जास्त वेगाने विकास झाला.

त्यामुळे चाकण, हिंजवडीला नवीन महापालिका करावी लागेल. याचबरोबर उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगसाठी नवीन महापालिका केली जाईल. कोणाला आवडो न आवडो या महापालिका कराव्याच लागतील. महानगरपालिका करण्यासाठी 5 लाख लोकसंख्या लागते. या सगळ्या भागातील लोकसंख्या किती आहे ते तुम्हाला माहिती आहे.

चाकणचा प्लॅन आला असून मी सांगितलं आहे की, तुम्ही मंजुरी घ्या, मी एकनाथ शिंदेंची मदत घेतो, असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे आता लवकरच पुणे जिल्ह्यात नवीन महापालिका पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, पाहणी दौऱ्यादरम्यानच अजितदादांना वाहतूक कोंडीचा अनुभव आल्याचं पाहायला मिळालं.

ते म्हणाले मी सकाळपासून दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल. यावेळी चाकण चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यामुळं ट्रफिक कोंडी झाली. यावेळी अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना वाहनं थांबवून कोंडी का केली? असा सवाल करत खडसावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT