US India Tariff war : अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे ट्रम्प चांगलेच संतापले आहेत. या रागातूनच त्यांनी भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकायला सुरूवात केली आहे.
शिवाय आणखी 21 दिवसांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिका भारतावर एकूण 50 टक्के आयात शुल्क लागू करणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचे आता जगभरात पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.
चीनने देखील अमेरिकेच्या या धोरणावर टीका केली आहे. कराचा गैरवापर अशा शब्दात चीनने ट्रम्प यांच्या धोरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून म्हणाले की, कराच्या गैरवापराला चीन ठामपणे आणि सातत्याने विरोध करत आला असून हा विरोध यापुढेही कायम राहिलं, असं म्हटलं आहे.
शिवाय व्यापार धोरणांचा गैरवापर होत असल्याचंही चीनने म्हटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा मित्र राष्ट्र असलेला चीन देखील अमेरिकेच्या विरोधात आणि भारताची बाजू घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या मनमानी कारभारामुळे भविष्यात जागतिक राजकारणाची गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, रशियाने देखील भारताची बाजू घेत ट्रम्प यांच्या कर आकारणीचा निषेध नोंदवला आहे. सार्वभौम देशांना त्यांचे स्वतःचे व्यापारी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात अमेरिकेला ठणकावलं आहे.
तर ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अन्यायकारक आणि अवास्तव असल्याचं म्हटलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी, ट्रम्प यांची ही कृती अन्यायकारक असून भारत आपल्या राष्ट्रीय हितांच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलणार असल्याचं स्पष्ट केलं.
तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या आणि मच्छिमारांच्या हिंतांबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांचं वक्तव्य हे ट्रम्प यांच्यासाठी सडेतोड उत्तर असल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.