Ajit Pawar addresses media to clarify his recent statement about industrialist Dhirubhai Ambani, dismissing allegations of disrespect.  sarkarnama
पुणे

Ajit Pawar Statement on Dhirubhai - धीरूभाई अंबानी बद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांनी दिलं स्पष्टीकरण अन् थेट..

Ajit Pawar Statement -यापूर्वी काही वक्तव्याबाबत माजी देखील चूक झाली आहे आणि त्याची जबरदस्त किंमत देखील मोजली आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवलं आहे.

Sudesh Mitkar

Ajit Pawar clarifies his remark on Dhirubhai Ambani -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारादरम्यान धीरूभाई अंबानी यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवून माध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा करताना अजितदादांनी चक्क राजकारण सोडून देण्याची भाषा केली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात रिलायन्स इंडस्ट्रीजचे निर्माते धीरूभाई अंबानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याबाबत ट्विट केल्याचं पाहायला मिळालं. तसंच काही माध्यमांनी याबाबत चुकीच्या बातम्या देखील प्रसारित केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचे काम करून धीरूभाई अंबानी हे कोट्यधीश झाले. असं मी म्हणालो होतो ” मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या ‘सोडून’ या शब्दाचा ‘चोरून’ असा विपर्यास करत हे वक्तव्य दाखवण्यात आले.'' तर अशा पद्धतीने वृत्त प्रसारित करणाऱ्या माध्यमांवर अजित पवारांनी प्रचंड नाराजी देखील व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले, “मीडियाने ‘ध’चा ‘म’ करून माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला.'' एवढंच नाही तर, ''जर मी चुकीचा शब्द वापरला असेल, तर मी राजकारण सोडेन.” असंही अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

याशिवाय, ''अजित पवार पुढे म्हणाले, कोणतेही काम कमी लेखू नये. पेट्रोल पंपावर काम करूनही धीरूभाई अंबानी यांनी मोठी स्वप्ने साकारली. तशीच तयारी तरुणांमध्ये हवी..! कामातूनच सोने निर्माण करता येते, असं मला सांगायचं होतं.” असं अजित पवार म्हणाले.

तर ''मी एक जबाबदार नागरिक असून कशा पद्धतीने बोलावं ते मला चांगलंच माहिती आहे. यापूर्वी काही वक्तव्याबाबत माजी देखील चूक झाली आहे आणि त्याची जबरदस्त किंमत देखील मोजली आहे. त्याबाबत मी आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे. मात्र 'ध' चा 'मा' करण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला त्याबाबत मी अत्यंत खेद व्यक्त करतो.'' असं यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT