Rajkot Fort  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : अजितदादांच्या जवळच्या नेत्याचा महायुतीला घरचा आहेर; म्हणाले, 'छत्रपतींसाठी शेकडो सरकारं..'

Pune Political News : राजकोट किल्यावरील पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. भविष्यामध्ये अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, याची खबरदारी घेण्याची मागणी यावेळी पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली.

Sudesh Mitkar

Pune News : मालवणमधील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यामध्येच अचानक कोसळला. हा पुतळा उभारताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे सदर घटनेचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने एस. एस. पी. एम. एस. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यााखाली मुक निदर्शने करण्यात आली.

त्यासोबतच यापुढे अशाप्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून सर्वच पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ॲाडीट करण्याची मागणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. (Ajit Pawar News)

राजकोट किल्यावरील पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. भविष्यामध्ये अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, याची खबरदारी घेण्याची मागणी यावेळी पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) म्हणाले, 'झालेला प्रकार हा वेदनादायक आहे. दोषींवर कडक कार्यवाही करून त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. या जागी सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून परत पुतळा बसवावा. आम्ही महायुतीचा भाग असलो तरी आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आहे. आम्हाला वाईट वाटत आहे की अशी घटना घडल्यानंतर राज्य शासनाने याबाबत त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, पुतळे उभारण्यासाठी घाई न करता त्याचे पावित्र्य राखण्याचे प्रयत्न आपण करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेले गड किल्ले अजूनही सुस्थितीत आहेत आणि आपण एक पुतळा उभारू शकत नसेल तर यापेक्षा महाराष्ट्राचे दुसरे दुर्दैव कोणतेही नाही, अशी टीका मानकर यांनी केली.

सरकारमध्ये सहभागी असतानाही हे आंदोलन का करीत आहात? असे पत्रकारांनी विचारले असता कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाले, 'छत्रपतींच्या अस्मितेकरीता सत्ता नसतानासुद्धा लढत होतो व सरकार असतानासुद्धा यापुढेही लढत राहणार. सरकारे येतील, जातील छत्रपतींसाठी शेकडो सरकारे कुर्बान करू परंतु, युगपुरुष छत्रपती शिवाजी महारांजाचा अनादर कधीच सहन केला जाणार नाही.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT