Gondiya Assembly Election : गोंदिया जिल्ह्यात विधानसभेसाठी चुरस; मविआ अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला...

Political News : अजित पवार गटाचे नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल या ठिकाणचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या ठिकाणच्या राजकारणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते.
Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVASarkarnama
Published on
Updated on

Gondiya News : लोकसभेच्या लढतीनंतर सत्ताधारी महायुतीला मोठा पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे समीकरण आता बदलण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ असून या ठिकाणी येत्या काळात हायव्होल्टेज लढत पहावयास मिळणार आहे.

गेल्या दोन वर्षांत शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा परिणाम याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला आहे. या ठिकाणी विधानसभेसाठी मोठी चुरस असून येत्या काळात मविआ अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Gondiya Assembly Election News)

गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याची ओळख आदिवासी बहुल जिल्हा अशीच राहिली आहे. राज्याच्या राजकारणात देखील हा जिल्हा तितकाच महत्त्वाचा असून अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल या ठिकाणचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या ठिकाणच्या राजकारणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय झाले ?

लोकसभा निवडणुकीसाठी भडारा-गोंदिया असा मतदारसंघ आहे. त्यामध्ये गोंदियातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, तिरोडा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मिळून हा लोकसभा मतदारसंघ झाला आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या. त्यावेळी प्रफुल्ल पटेल पुन्हा येथून निवडणूक जिंकले. 2014 मध्ये भाजपने येथून नाना पटोले यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2018 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली होती, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ही जागा पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आली आणि सुनील बाबुराव मेंढे खासदार झाले. 2024 मध्ये काँग्रेसचे प्रशांत पाडोळे हे 37 हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचा पराभव केला. या पाच निवडणुकीत राष्ट्रवादी दोन वेळा, भाजप दोन वेळा तर काँग्रेस एक वेळा विजयी झाला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रशांत पाडोळे यांच्या विजयाने विधानसभेचे समीकरणे बदलली आहेत.

Mahayuti Vs MVA
Sangeeta Thombare: खळबळजनक!भाजपच्या माजी महिला आमदाराच्या गाडीवर हल्ला; केजमध्ये काय घडलं?

गोंदिया जिल्हयातील पक्षीय बलाबल :

गोंदिया जिल्हयात चार विधानसभा मतदारसंघ येतात. गोंदियात अपक्ष आमदार आहेत तर मोरगांव अर्जुनीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. देवरी आमगाव येथे काँग्रेसचे आमदार आहेत तर तिरोडा-गोरेगावमध्ये भाजपचे आमदार आहेत. पक्षीय बलाबल पहिले तर एक अपक्ष तर दोन महायुतीचे तर एक महाविकास आघाडीचा आमदार याठिकाणी आहे.

मतदारसंघ व पक्षनिहाय आमदार :

गोंदिया : विनोद अग्रवाल (अपक्ष)

देवरी : आमगाव : सहषराम कोरोटे (काँग्रेस)

तिरोडा-गोरेगाव : विजय रहांगडाले (भाजप)

मोरगांव अर्जुनी : मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट)

Mahayuti Vs MVA
Mahayuti News : डिमांड 50 जागांची, चाचपणी 288 मतदारसंघाची; युतीतील 'हा' पक्ष स्वबळाच्या वाटेवर?

2019 मधील विधानसभानिहाय चित्र :

गोंदिया विधानसभा मतदारसंघ :

गोंदिया विधानसभेसाठी 2019च्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा पराभव केला. या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1 लाख 2 हजार 996 मते मिळाली होती. तर भाजपचे गोपाल अग्रवाल यांना 75 हजार 827 मते मिळाली होती.

या वेळेस होत असलेल्या निवडणुकीसाठी गोंदिया विधानसभेसाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. भाजपकडून सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले पंकज रहांगडाले, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे, गोपालदास अग्रवाल इच्छुक आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी आमदार रमेश कुथे, पंकज यादव हे इच्छुक असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र जैन, केतन तुरकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून राजकुमार पटले, अमर वराडे, राजीव ठकरेले हे निवडणूक लढायला इच्छुक आहेत.

Mahayuti Vs MVA
Aaditya Thackeray VS Narayan Rane : राणे-ठाकरे समर्थक भिडताच, उद्धव ठाकरेंनी कोणाला केला फोन...

आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघ :

2019 साली झालेल्या अटातटीच्या विधानसभा निवडणुकीत आमगाव-देवरी मतदारसंघातून काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा ८ हजार मताने पराभव केला होता. या निवडणुकीत आमदार कोरोटे यांना 88 हजार 265 इतकी मत मिळाली होती. तर भाजपचे संजय पुराम यांना 80 हजार 845 मते मिळाली होती.

आमगाव-देवरीमध्ये सध्या काँग्रेसचे सहषराम कोरोटे हे आमदार असून या ठिकाणी भाजपकडून माजी आमदार संजय पुराम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून गडचिरोली-चिमूरचे खासदार नामदेव किरसान यांचे चिरंजीव दुष्यंत किरसान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्ये देखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी कोण निवडणूक लढणार यावरून कोण बाजी मारणार हे ठरणार आहे.

Mahayuti Vs MVA
Narayan Rane News : राड्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्हाला....'

मोरगांव अर्जुनी विधानसभा मतदारसंघ :

2019 साली झालेल्या अटातटीच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा 718 मताने पराभव केला होता. या निवडणुकीत मनोहर चंद्रिकापुरे यांना 72 हजार 400 मते मिळाली होती. तर भाजपचे राजकुमार बडोले यांना 71 हजार 782 मते मिळाली होती.

या ठिकाणी यावेळेस हायव्होल्टेज लढत पाहावयास मिळणार आहे. या ठिकाणी माजी मंत्री राजकुमार बडोले हे भाजपकडून इच्छुक असून सध्या महायुतीमध्ये असलेले अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे देखील या ठिकाणी दुसऱ्यांदा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर त्यांचे चिरंजीव डॉ. सुगत चंद्रिकापूर यांनी देखील जनसंपर्क दौरे सुरू केले असून ते देखील निवडून लढायला इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा कॊणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा मतदारसंघ आघाडीत कोणाच्या वाट्याला येणार यावरून उमेदवार ठरणार आहे. काँग्रेसकडून हरीश बनसोड, डॉ. अजय लांजेवार, दिलीप बनसोड, अनिल दहिवले इच्छुक आहेत. यावेळेस आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे लढले नाही तर त्यांचे चिरंजीव डॉ. सुगत चांद्रिकापुरे या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत. तर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दानेश साखरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणी महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मिथुन मेश्राम हे इच्छुक असून त्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.

Mahayuti Vs MVA
Narayan Rane News : '...तर एकहीजण घरापर्यंत पोहोचला नसता'; इतिहास सांगत नारायण राणेंनी भरला दम

तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघ :

तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2019 साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांना 26 हजार मताने धूळ चारली होती. या निवडणुकीत विजय रहांगडाले यांना 76 हजार 482 तर रविकांत बोपचे यांना 50 हजार 590 इतकी मते मिळाली होती.

तिरोडा-गोरेगाव या ठिकाणी महाविकास आघाडीकडून सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांची चिरंजीव रविकांत बोपचे हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तर काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र कटरे गोरेगाव तालुक्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजपचे विजय रहांगडाले हे आमदार आहेत. मात्र, भाजपकडूनच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे, धर्मेंद्र तुरकर, हेमंत पटले, गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे हे या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी तयारी करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mahayuti Vs MVA
Bhandara Assembly Election: भंडारा जिल्ह्यातील लढतीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा लागणार कस ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com