Ajit Pawar| Sachin waze
Ajit Pawar| Sachin waze 
पुणे

'कुठून दुर्दशा आठवली आणि त्याला सर्व्हिसमध्ये घेतले'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'पूर्वी जरी काही चिरीमिरीचा प्रकार झाला तर त्याला खेडेगावातील लोक बोफोर्स झाला म्हणायचे. पण आता काही झालं की म्हणतात, याचा सचिन वाझे झाला. हा सचिन वाझे आहे. कुठून दुर्दशा आठवली आणि त्याला सर्व्हिसमध्ये घेतले. अर्थात कायदा आपले काम करत आहे. पण एका व्यक्तीमुळे संपूर्ण पोलिस दल बदनाम होते. ते होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि चांगलं काम करा,' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार सचिन वाझेबद्दल खंत व्यक्त केली.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्याालयात चार चाकी आणि दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, "एका बहाद्दर पठ्ठ्याने असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. त्यामुळे माझ्याच मोबाईल नंबरवरून फोन केल्यासारख वाटलं. त्याने वीस लाख रुपये मागितले. पण माझ्या नंबरवरून फोन केला की कॉलर आयडीमुळे फोन नंबर येत नाही. हे ज्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीला माहित होतं. चौबे का कोणाचे नाव घेतले. आता याने केला होता की आणखी कोणी केला होता काय माहिती?' अस म्हणत अजित पवारांनी त्यांच्या शेजारी असलेल्या चौबे नावाच्या पीएची फिरकी घेतली.

दरम्यान, अँटिलिया स्फोटकं प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगवास भोगत आहेत. याच प्रकरणात पुढे तत्कालीन गृहमंत्री अनुल देशमुखांचे नाव आल्यामुळे त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यांनाही पुढे तुरुंगात जाव लागलं. त्या प्रकरणापासून राज्यात आजतागायत काही ना काही घडामोडी सुरुच आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT