Ajit Pawar, amit shah Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : अजितदादांना राजकीय डेंगी नव्हता ?

Ajit Pawar Group vs Shinde Group: माझी मते मी स्पष्टपणे मांडतो

Mangesh Mahale

Pune News: अजित पवार गट आणि शिंदे गटात (Ajit Pawar Group vs Shinde Group) धुसफूस सुरू असून, अजित पवार गटाने विकास निधी वाटपावरून (Allocation of funds) शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात दिल्लीत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. अजित पवारांनी शाह यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बोलले जाते, यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

"मला खरंच डेंगी आजार झाला होता, राजकीय आजार झाला नव्हता. अमित शाहांकडे कुठलीही तक्रार करण्यासाठी गेलो नव्हतो. तक्रार करणं माझा स्वभाव नाही. माझी मते मी स्पष्टपणे मांडतो," असे अजित पवारांनी सांगितले.

पु्ण्यातील सारथी संस्थेला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातील काही अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या त्यावर अजित पवार म्हणाले, "जे कामात कमी पडले अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत," "सध्या पुणे, नागपूर, मुंबई येथे अनेक महत्त्वाची कामे सुरू आहेत. कायदा सुवव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे," असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षणावरून राजकीय नेते वादग्रस्त विधानं करीत आहेत, यावर पवार म्हणाले, "कुणीही भडकाऊ भाषणे करू नये, नागरिक, सत्ताधारी आणि विरोधकांची यांचे भान ठेवावे,"

"अलीकडे वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्या अधिकाराचा वापर आपण कशाप्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, अलीकडे कोणी काही बोलतो. आरेला कारे केले जाते. ही शिकवण ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली नाही. ही महाराष्ट्राची परंपरा-संस्कृती नाही, हे सर्वांनीच ध्यानात घेतले पाहिजे," असा टोला सर्व राजकर्त्यांना अजित पवार (ajit pawar) यांनी लगावला. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (ता.२५) अभिवादन करण्यासाठी अजित पवार कराड दौऱ्यावर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT