Sanjay Shinde:...तर आमदार शिंदेंचा फोटो आम्ही गळ्यात बांधून फिरू; कार्यकर्ते भावनिक

Ujani Dam Water:आजपर्यंत एकाही आमदाराला दिलेला शब्द पूर्ण करता आला नाही
MLA Sanjay Mama Shinde
MLA Sanjay Mama ShindeSarkarnama
Published on
Updated on

-हर्षल बागल

Solapur News : उजनीचे पाणी बेंद ओढ्यात सोडण्यात येईल, असे आश्वासन आत्तापर्यंत सर्वच आमदारांनी दिले; पण त्यांनी ते पूर्ण केले नाही. बेंद ओढ्यात पाणी सोडण्याचा आमदार संजयमामा शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला तर आम्ही कार्यकर्ते त्यांचा फोटो गळ्यात बांधून सर्वत्र फिरू, असे भावनिक आवाहन चौभे पिंपरीचे उपसरपंच योगेश जाधव यांनी केले आहे.

"उजनी धरणातून सीना नदीमध्ये सोडण्यात आलेल्या बोगद्यावर कव्हे ते महादेववाडी सीमेवर बंदिस्त दरवाजा टाकण्याची मागणीदेखील तीन आमदारांकडे आजपर्यंत आम्ही शेतकऱ्यांनी केलेली आहे, परंतु एकाही आमदारांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. सर्व आमदारांनी आश्वासने देण्यापलीकडे काहीही केले नाही," अशी नाराजी योगेश जाधव यांनी व्यक्त केली.

"आमच्या तीन पिढ्यांनी दिवंगत आमदार विठ्ठलराव शिंदे, आमदार बबनदादा शिंदे , आमदार संजयमामा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजीत शिंदे, विक्रम शिंदे यांच्या तीन पिढ्यांवरती प्रेम केले. पण आम्हाला पाण्याच्या विषयावरती शिंदे कुटुंबाने नाराज केलं. आजपर्यंत सर्व आमदारांनी आम्हाला शब्द दिला, की उजनीचं पाणी बेंद ओढ्यात सोडण्यात येईल. परंतु आजपर्यंत एकाही आमदाराला दिलेला शब्द पूर्ण करता आला नाही," अशी नाराजी जाधव यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Sanjay Mama Shinde
Nagar News: पवारांचा आदेश रोहितदादा मोडणार नाहीत; 'नगर दक्षिण' लढविणार ?

आमदार संजयमामा शिंदे (MLA Sanjay Mama Shinde) यांनी कुर्डूच्या सभेमध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या दरम्यान शब्द दिला आहे, बेंद ओढ्यात पाणी सोडण्यामध्ये आमदार संजयमामा शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला, तर आम्ही चौभे पिंपरीतील तरुण कार्यकर्ते त्यांचा फोटो गळ्यात बांधून फिरू, असे जाधव म्हणाले.

सीना माढा उपसा सिंचन योजनेत बादलेवाडी, शेडशिंगे, भोगेवाडी, चौभे पिंपरी, ढवळस, कुर्डू, पिंपळखुटे, भोसरे, रणदिवेवाडी, वडाचीवाडी, महापूर अशा गावांचा समावेश करीत उजनीचे पाणी सोडण्याची मागणी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून आहे. आमदार बागलांपासून ते आमदार नारायण पाटलांपर्यंत आम्हाला फक्त आश्वासन मिळाली. आम्हाला आमदार शिंदे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आमदार शिंदे आमचे शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न सोडवतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे योगेश जाधव यांनी "सरकारनामा"शी बोलताना सांगितले.

MLA Sanjay Mama Shinde
NCP News: अजितदादांच्या नेत्याचा नादच खुळा; नृत्यांगनेवर पैसे उधळणं आलं अंगलट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com