Ajit Pawar sarkarnama
पुणे

Ajit Pawar : माळेगावच्या सभेमधून अजितदादांचा व्हिडिओ काॅल; म्हणाले, 'पूरग्रस्तांचा संसार...'

Ajit Pawar Nanded flood victims : नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ काॅलद्वारे संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले.

Roshan More

Ajit Pawar News : सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसाल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौर करत नुकसानीची पाहणी केली.नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मणार धरण परिसरातील बहाद्दरपुरा, शेकापूर, घोडज पूरबाधित नागरिकांशी अजित पवारांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू, अशा शब्द पूरग्रस्तांना दिला.

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उपमुख्यमंत्री पवार यांना व्हिडिओ कॉल आला. या कॉलदरम्यान पवार यांनी नांदेड जिल्ह्यात नेमक्या कोणत्या भागांत नागरिक अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर किंवा आर्मीची मदत घेण्याची आवश्यकता आहे का? एनडीआरएफचे पथक तातडीने पाठवावे लागेल का याबाबत सविस्तर माहिती घेतली.

“आम्ही या संकट काळात तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या जातील. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जाईल. सरकार तुमच्या सोबत आहे, या शब्दांत पूरग्रस्तांना दिलासा दिला.

मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. पीकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर जात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी दिली तसे मदतीसाठीचे निवेदन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT