Rohit Pawar and Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Vs Rohit Pawar :'असली नौटंकी बारामतीकर..' ; भावनिक रोहित पवारांना अजित पवारांनी लगावला टोला!

Baramati Lok Sabha Constituency : 'मग तिथे काय सदानंद सुळे पर्स घेऊन जातात काय?' असा सवालही सुप्रिया सुळेंचं नाव न घेता उपस्थित केला.

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. तत्पुर्वी रविवार 5 मे रोजी प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारासाठी जोरदार सभा पार पडल्या. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावरून यावर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावल्याचे दिसून आले.

प्रचारसभेत भाषणा दरम्यान अजित पवार(Ajit Pawar) मोबाईल दाखवत म्हणाले, 'हे पाहा आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो, मला मतदान द्या. असली नौटंकी बारमतीकर खपवून घेणार नाही. तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हा झाला रडीचा डाव. हे असलं नाही चालतं.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय 'मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो. की काही काहीजण ते करणार अरे त्यांना जिल्हापरिषदेची तिकीटं मी दिली. गळ्याची शपथ मी खोटं बोलत नाही. साहेबांनी(शरद पवार) सांगितलं अजिबात देऊ नको, मी त्यांचं ऐकलं नाही त्याला तिकीट दिलं. त्यानंतर तो म्हणाला हडपसरला उभा राहायचं, म्हटलं तिथे तुला देणार नाही चेतन तुपेची आम्ही तयारी करतो आहोत. तू कर्जत-जामखेडला जा तिथे आम्ही प्रयत्न करू सगळे मदत करू.' असंही अजित पवार म्हणाले.

तसेच 'आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेलं आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करताय? अरे तुझ्या पेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी-पावसाळी मी बघितलेली आहेत. बारामतीमधील मुलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर भावनिक होऊन जमणार नाही.' असंही अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवलं.

तर महाविकास आघाडीच्या सभेवर निशाणा साधत अजित पवारांनी म्हटलं, 'इथे जर मी खुर्च्या टाकल्या असत्या तर या सभेचे रूप चौपट ते पाचपट झालं असतं. काहींना अशी गर्दी होणार नाही, बारामतीकर प्रतिसाद देणार नाहीत, हे समजल्यामुळे त्यांनी खुर्च्या टाकल्या होत्या.'

याचबरोबर 'मोदी-शाहांवर टीका करून, संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होणार नाही. अरे काय तुम्ही टीका करतात, महिला उमेदवार लोकसभेत गेल्यानंतर त्यांचा नवरा काय पर्स घेऊन मागे मागे जाणार? आता अजित पवार काय पर्स घेईल कारे, तुम्हाला पटतं का? मग आपण जाताना सदानंद सुळे काय पर्स घेऊन जातात का तिथे? अरे मला तर एकाला अशी उत्तर देता येतील, तुम्हाला पळता भई थोडी होईल. तुम्ही मुंबईच गाठाल दुसरं कुठं थांबणार नाहीत. पण आपण म्हणतो जाऊ दे आपलीच बहीण, भावंडं आहेत. आपलीच लोकं आहेत. हे असं चालणार नाही.' असं म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळेंवरही(Supriya Sule) अजित पवारांनी निशाणा साधला.

भाषणात शेवटी, 'या सभेला जमलेली गर्दी पाहिल्यावर नक्कीच स्पष्ट होतं, की विजय आपलाच आहे फक्त गाफिल राहू नका. सर्व मतदारसंघामध्ये लीड आपल्यालाच मिळणार आहे.' असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT