Rohit Pawar On Ajit Pawar : PM मोदींचा फोन कशासाठी येतो? रोहित पवारांची अजितदादांवर प्रश्नांची सरबत्ती

Baramati Lok Sabha Constituency : सत्ता असल्यानेच त्यांनी काही नेत्यांना पदे बहाल केली. त्यातूनच त्यांनी त्यांच्या परिसराचा विकास केला. त्यामुळे कुणीही फक्त माझ्यामुळेच विकास झाला, असे म्हणू नये. त्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSarkarnama

Baramati Political News : राज्याचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या प्रचाराचा रविवारी (ता. 5) शेवटचा दिवस होता. यावेळी सुप्रिया सुळेंसाठी बारामतीतील सांगता सभेत आमदार रोहित पवारांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी भाजप नेत्यांचे शरद पवार, सुळेंवरील विधानांचे व्हिडिओ दाखवले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत सडेतोड विधाने करत रोहित पवारांनी त्यांच्यार प्रश्नांची सरबत्ती केली.

बारामतील मोरगाव रोडवरील लेंडी पट्टी येथील क्रिकेटच्या मैदानावर झालेली सभा रोहित पवारांनी Rohit Pawar चांगलीच गाजवली. अजित पवार वारंवार सांगतात की महायुतीचा उमेदवार निवडून द्या, म्हणजे कामांना गती येईल. तुम्हाला पाणी मिळेल. आपली कामे चुटकीसरशी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा Narendra Modi एक फोन आला तरी कसलेही काम तात्काळ मार्गी लागते. अजितदादांच्या या दाव्याचा रोहित पवारांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.

रोहित पवार म्हणाले, अजितदादा Ajit Pawar म्हणतात, की मोदीसाहेबांचा एक फोन आला तर लगेच काम होते. आता तुम्ही मोदीसाहेबांसोबत जाऊन दहा महिने झाले, मात्र आमच्या कांद्याचा प्रश्न सुटला नाही. दुधाचे दर वाढले नाहीत. खताचे दर वाढलेत. कष्टकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. आमच्या कोरवाहू पट्ट्याला आठ महिन्यांत पाणी देऊ शकले नाहीत. मग दादा मोदीसाहेबांचा फोन नेमका कशासाठी येतो? तुमच्यावर ही कारवाई करेल, ती कारवाई करेल, ये माझ्याकडे, यासाठी फोन येतो का? याला विकास म्हणतात का? असे म्हणत रोहित पवारांनी अजितदादांना टोले लगावले.

Ajit Pawar, Rohit Pawar
Rohit Pawar : शरद पवारांचे 'ते' विधान अन् रोहित पवार भरसभेत रडले; बारामतीत नेमके काय घडले?

दिल्लीच्या नेते म्हणतात की पवारांना कुटुंब सांभाळता येत नाही, अशी टीका करतात. तर बारामतीचा Baramati विकास मी केला असा दावा वारंवार अजित पवार करतात. यावर रोहित पवार म्हणाले, पवारांचे कुटुंब हे फक्त पवार अडनावाचे नाही तर राज्यातील जनता आहे. तर राज्यात 2014 पर्यंत सत्ता राखण्यासाठी पवारांनी मोठे कष्ट केले आहेत.

2019 ला कुणाच्या ध्यानी मनी नसतानाही महाविकास आघाडीचे सरकार पवारांमुळे स्थापन झाले. ही सत्ता असल्यानेच त्यांनी काही नेत्यांना पदे बहाल केली. त्यातूनच त्यांनी त्यांच्या परिसराचा विकास केला. त्यामुळे कुणीही फक्त माझ्यामुळेच विकास झाला, असे म्हणू नये. त्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

Ajit Pawar, Rohit Pawar
Jay Pawar Meet Manoj Jarange : मनोज जरांगे-जय पवार भेटीचं नेमकं गणित काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com