Chandrakant Patil, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

'कमी महत्चाचे खाते मिळाल्यातून चंद्रकांत पाटलांचे आईवडिलांविषयी संस्कृतीहिन वक्तव्य!'

अजित पवार (Ajit Pawar) यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar : पिंपरी : आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण नरेंद्र मोदी, अमित शहांना दिल्या, तर ते सहन करणार नाही, असं विधान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतेच केले. त्याचा समाचार विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (ता.८) पिंपरी-चिंचवडमध्ये घेतला. ही विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीने असे विधान करणे बरोबर नाही, असे ते म्हणाले. उच्च तंत्रशिक्षणसारखे कमी महत्वाचे खाते मिळाल्याने त्यांनी ते केलं असावं, असा टोला त्यांनी लगावला. पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) हौसिंग सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटावेत, या हेतूने अजितदादांनी दसऱ्याच्या दिवशी (ता.५) शहरातील सोसायटीधारकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले होते. त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार लगेचच त्यांनी हे प्रश्न सुटावेत म्हणून तीन दिवसांतच आज पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखरसिंह यांच्याबरोबर दीड तास बैठक घेतली.

स्थानिक काही प्रश्‍न आपल्या पातळीवर सोडविण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी यावेळी दिले. तर, राज्य शासनाशी निगडीत प्रश्‍नांवर मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून पर्याय काढला जाईल, असे अजितदादांनी सांगितले.

या वेळी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, भाऊसाहेब भोईर, राजेंद्र जगताप, माया बारणे आदी या बैठकीला उपस्थित होते.

नाशिक बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून ती भरीवपणे देण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. तसेच सरकारी मदतीत भेदभाव केला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मृत गोविंदाला दहा लाख आणि नाशिक अपघातातील मृतांना पाच लाख रुपयांची मदत असा भेदभाव व्हायला नाही पाहिजे, असे ते म्हणाले.

विधानसभेची पोटनिवडणूक (अंधेरी पूर्व, मुंबई) होते. सरंपचांसह ग्रामपंचायतीच्याही निवडणूक घेतल्या जातात, मग राज्यातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका राज्य सरकार का घेत नाही, अशी विचारणा त्यांनी केली. दरम्यान, सर्वच निवडणुका या प्रचंड खर्चिक झाल्या असल्याने विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक लागणार नाही, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT