शिंदेंच्या याचिकेतील 'त्या' मुद्यावर ठाकरेंनी ठेवले बोट

शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) निवडणूक चिन्ह वाद आता निवडणूक आयोगासमोर आहे.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) निवडणूक चिन्ह वाद आता निवडणूक आयोगासमोर आहे. दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. यात ठाकरे यांच्याकडून आज महत्वाचा दावा आयोगासमोर करण्यात आला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागत आहेत, असा सवाल ठाकरे गटाने आयोगासमोर केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत असेही ठाकरे गटाने याचिकेत म्हटले, असल्याची माहिती मिळत आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेल्या 'त्या' नेत्यावर पोलिसांची मोठी कारवाई

दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहे. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे व दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहे. मात्र, विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असेही ठाकरे यांनी आयोगाला सांगितले आहे.

ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला आव्हान दिले गेलेले नाही. शिंदे यांनी सुद्धा ही बाब आपल्या याचिकेत मान्य केली आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेत हा युक्तिवाद करण्यात आला आहे. मुख्य नेता या पदावर शिंदेंनी स्वतःला नेमले आहे. मात्र, अशा पद्धतीचे कुठलेही पद शिवसेनेच्या घटनेत नाही, असा दावा ठाकरे यांच्याकडून आयोगासमोर करण्यात आला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकी लढणार नाहीत मग चिन्ह का मागत आहेत? ज्या जागेवर निवडणूक होत आहे तिथे आमचाच उमेदवार आहे. त्यामुळे चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
'घराबाहेर पडलेल्यांना घरावर कसा हक्क सांगता येईल?'

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, निवडणूक आयोगाकडे देसाई यांनी सर्व प्रतिज्ञापत्र सादर केली. आम्ही सादर केलेल्या सर्व प्रति या सत्य आहे. शिवसेना कुणाची तर ती शिवसैनिकांची आहे. आमदार, खासदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी निवडून दिले म्हणून आम्ही निवडून आलो आहोत. पक्ष पहिला आहे. पक्षाला ते चिन्ह मिळालेले आहे.

म्हणून आम्हाला निवडणुकीसाठी ते चिन्ह देण्यात येते. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त पक्षात जी निवड होते, ती पक्ष प्रमुख करतात, असेही त्यांनी सांगितले. नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यात 2023 पर्यंत पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी निवड करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com