PM Narendra Modi News, Ajit Pawar News
PM Narendra Modi News, Ajit Pawar News Sarkarnama
पुणे

अजित पवार, फडणवीसांनी केले पंतप्रधानांचे स्वागत !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथील सभास्थानी पोचण्यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर पोहचले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट, भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. (PM Narendra Modi News)

पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी देहूत मोठी तयारी करण्यात आली आहे. वारकरी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच देहू परिसरातील स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सुमारे पावणेदोन वाजता मोदी यांचे देहूत आगमन झाले. शिळा मंदीराचे लोकार्पण झाल्यानंतर मोदी यांचे सभास्थळी आगमन झाले.याआधी पंतप्रधान मोदी यांनी शिळा मंदीर तसेच इंद्रायणी नदी तसेच या संपूर्ण परिसराची पाहणी केली.

सभास्थानी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. सभेच्या ठिकाणी पोचणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करूनच सोडण्यात येत आहे. ज्यांनी काळे कपडे परिधान केले आहेत, काळा मास्क किंवा कोणत्याही स्वरूपातील काळे कापड घातलेल्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. पाण्याची बाटली तसेच इतर कोणत्याही वस्तू घेऊन प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT