Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : मोदींच्या पुण्यातील सभेत अजितदादांचा 'रुबाब' भारी !

Political News : पीएम मोदी यांच्यासह सर्वांची मने त्यांनी जिंकली. विशेषतः पुणे जिल्ह्यातील चार पैकी दोन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याने त्यामुळे अजितदादा गेल्या काही दिवसापासून पीएम मोदींच्या सभेसाठी प्रयत्नशील होते.

सरकारनामा ब्युरो

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारीसाठी होत असलेल्या सभेच्या संपूर्ण तयारीची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होती. या सभेसाठी अजितदादा गेल्या चार दिवसापासून मेहनत घेताना दिसत होते. सर्व जबाबदारी त्यांनी पेलत या सभेसाठी मोठी गर्दी जमवली. त्यामुळे पीएम मोदी यांच्यासह सर्वांची मने त्यांनी जिंकली. विशेषतः पुणे जिल्ह्यातील चार पैकी दोन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्यामुळे अजितदादा गेल्या काही दिवसांपासून पीएम मोदींच्या (Narendra Modi) सभेसाठी प्रयत्नशील होते.

सभेवेळी अजित पवार (Ajit Pawar) यांचा वेगळाच दरारा होता. त्यांनी सर्व सभेचे नियोजन काटेकोरपणे शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी सर्व जबाबदारी शिस्तबद्ध पद्धतीने संभाळली. बारामती मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून गर्दी जमविण्याचे आवाहन त्यांच्यासमोर होते. हे आव्हान अजित दादांनी लीलया पेलत मोठी गर्दी जमवली. (Ajit Pawar News )

पुण्यातील सभेच्या ठिकाणीही त्यांचा रुबाब व दरारा मात्र कायम होता. व्यासपीठावर पीएम मोदी येण्यापूर्वी त्यांनी भाषण केले. यावेळी महायुतीच्या मंचावरुन दादा चांगलेच बरसले. यावेळी त्यांनी पीएम मोदी यांच्या कामांचे कौतुक केले. त्यासोबतच यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. त्यांनी या भाषणातून पुणे जिल्ह्यच्या सर्वांगीण विकासासाठी चारही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान करीत उपस्थितांची मने जिंकली.

त्यानंतर पंतप्रधान मोदी सभेस्थळी आल्यानंतर त्यांचा व्यासपीठावर स्वतंत्रपणे सत्कार केला. यावेळी त्यांनी महायुतीमधील भाजपचे कमळ, शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ असे तीन चिन्ह एकत्र असलेला फोटो देत त्यांचे आदरातीथ्य केले. त्यामुळे त्यांनी तीन पक्षांचे चिन्ह असलेले वेगळे गिफ़्ट पाहून पंतप्रधानदेखील अजित दादांवर चांगलेच खुश झाल्याचे पहायला मिळाले.

सत्कार केल्यानंतर लगेचच बोलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या जागेवरून उठले. त्यानंतर शिंदे यांच्या जागेवर बसत अजितदादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी दोघेजणही हसत-हसत चर्चा करीत असल्याने या दोघांमध्ये काही तरी हास्यविनोद झाला असल्याचे जाणवत होते. त्यासोबतच या वेळातच या चारही मतदारसंघातील सध्यस्थितीबाबतही त्यांनी चर्चा केली असण्याची शक्यता आहे. एकंदरीत अजित दादांच्या आजच्या त्यांचा लूक व रुबाब भारीच होता, अशी चर्चा सभेनंतर उपस्थित नेतेमंडळी व कार्यकर्त्यात रंगली होती.

SCROLL FOR NEXT