Narendra Modi News : भटकत्या आत्म्यामुळं राज्यात अस्थिरता; PM मोदींचा नेमका रोख कुणाकडे?

Pune Political News : नरेंद्र मोदी जिल्ह्यातील पुण्याचे मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या सुनेत्रा पवार, शिरूरमधील शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे श्रीरंग बारणे या महायुतीच्या उमेदवारांच्या प्राचारार्थ पुण्यात आले होते.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Maharashtra Political News : महाराष्ट्राने अनेक वर्षे राजकीय अस्थिरता अनुभवली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्य काही भटकत्या आत्म्यांचे शिकार झाले आहे. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने 45 वर्षांपासून राज्यात अस्थिरता निर्माण केली आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर Sharad Pawar निशाणा साधला.

नरेंद्र मोदी Narendra Modi जिल्ह्यातील पुण्याचे मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या सुनेत्रा पवार, शिरूरमधील शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे श्रीरंग बारणे या महायुतीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्राचारार्थ पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर सत्तेसाठी भटकती आत्मा म्हणत प्रहार केला.

नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक आत्मे भटकत असतात. त्यानुसार राज्यात एक आत्मा भटकत आहे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी 45 वर्षांपूर्वी खेळ सुरू केला. तेव्हापासून राज्य अस्थिरतेच्या गर्तेत गेले. त्या आत्म्यामळे अनेकांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

Narendra Modi
Narendra Modi On Congress : 'कर्नाटक पॅटर्न'वरून मोदींचा काँग्रेसला कडक इशारा; 'मी जिवंत आहे तोपर्यंत ओबीसीत...'

ही भटकती आत्मा विरोधकांनाच नाही तर स्वतःच्या पक्षात आणि कुटुंबातही अस्थिरता निर्माण करते. 1995 मध्ये भाजप - शिवसेना सरकार आले होते, त्यावेळीही त्या आत्म्याने सरकार अस्थिरत करण्याचे काम केले. 2019 मध्ये तर जनतेच्या कौलाचा अनादर केला. आज ती आत्मा राज्यातच नाही तर देशभर अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोलाही नरेंद्र मोदींनी पवारांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशभरातील अस्थिरता नष्ट करण्यासाठी अशा भटकत्या आत्म्यापासून देशाला वाचवूयात. त्यासाठी एक मजबूत सरकार देण्याची गरज आहे, असे म्हणत मोदींनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच राज्यात कायम सध्याचे महायुती सरकार राखण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राज्यातील काही गेल्या काही वर्षांची विकासाची कसर भरून निघणार असल्याचेही मोदींनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Narendra Modi
Narendra Modi Satara : देशात लवकरच मोठं कांड होणार? PM मोदी नेमके काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com