Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News: 'भावी मुख्यमंत्री'च्या बॅनरवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'' मी मुख्यमंत्री...''

Maharashtra News : '' ...तोपर्यंत मला मुख्यमंत्री होता येणार नाही!''

सरकारनामा ब्यूरो

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला मुंबईत 'भावी मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख असलेले बॅनर झळकले होते. तसेच अजित पवार यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेलं पोस्टर मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर झळकल्यानं राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदावरुन शर्यत असल्याची जोरदार चर्चा सुरु रंगली आहे. मात्र, आता अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचं पोस्टर झळकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ययावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, काही उत्साही कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून बॅनर लावले, पण 145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही. त्यामुळे जरी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले तर ते मनावर घेऊ नका. त्या पोस्टरला फार महत्त्व देऊ नका असं पवार म्हणाले.

तसेच उद्या जर मी तुमचं होर्डिंग लावलं, तरी 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या होर्डिंग लावण्याला काहीही अर्थ नाही. हे फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान असतं असंही अजितदादा यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार( Ajit Pawar) यांचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर्स झळकले आहेत. यावर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा, एकच वादा अजितदादा अशी कॅप्शनही दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला देखील झळकले होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्सची जोरदार चर्चा झाली होती. मुंबईत जागोजागी जयंत पाटील यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर काही पोस्टर्स झळकले आहे. या पोस्टर्सवर जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यांना फक्त पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तरी आपले राज्य २५ वर्ष पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी खात्री आहे. मात्र, हे फक्त भाषणातून बोलायचे नाही. येत्या वर्षभरात अजितदादांच्या कामाची पद्धत घराघरात पोहचवून पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे असे आमदार निलेश लंके म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT