Ajit Pawar Sarkarnama
पुणे

तराफा बंद पडल्याने अजित पवार अडकले धरणाच्या मधोमध

लगेचच तलावातील दुसऱ्या बोटीने बंद तराफ्यावरील अजितदादांना आपल्या बोटीत घेतले.

सरकारनामा ब्यूरो

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सायंकाळी हिंजवडीजवळच्या कासारसाई (ता.मुळशी) धरणातील मत्स्यपालन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा तराफा धरणाच्या मध्येच अचानक बंद पडल्याने मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता. मात्र, पवार यांनी लाईफ जॅकेट घातले होते.लगेचच तलावातील दुसऱ्या बोटीने बंद तराफ्यावरील अजितदादांना आपल्या बोटीत घेतले. त्यानंतर त्यानी आपली पाहणी पूर्ण केली. एवढ्या तणावपूर्ण प्रसंगानंतरही त्यांनी इथलं पर्यटन म्हणजे खूप कसरत असते, अशी मिश्कील टिपण्णी करून तणावपूर्ण वातावरण काहीसे हलके करण्याचा प्रयत्न केला.(Ajit Pawar got stuck in the middle of the dam as the raft stopped)

तराफ्याच्या क्षमतेपक्षा अधिकजण त्यावर उभे राहिल्याने त्याच्या इंजिनवर ताण आला. त्यामुळे तराफा बंद पडला. अनेक प्रयत्न करुनही इंजिन सुरु झाले नाही. त्यामुळे जवळच्या बोटीची मदत घेण्यात आली. परिणामी पुढील दौरा पार पडला.

कासारसाई मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला पवार यांनी आज भेट दिली. तेथील मस्त्यपालनाची त्यांनी पाहणी केली. त्यासाठी तलावात मध्यभागी असलेल्या या मस्यपालन प्रकल्पात त्यांना जायचे होते.तेथे तराफ्याने जाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यावर जाण्यापूर्वीच अजितदादांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका, असे सांगितले होते. तरीही तराफ्यावर गर्दी करण्यात आली. त्यामुळे अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला गेला.त्यामुळे धरणावर जमलेले अधिकारी आणि नागरिकांच्या काळजाचा ठोका क्षणभर चुकला होता. दरम्यान, तराफ्यावरील माणसे उतरताच तो हलका झाल्याने लगेच सुरु झाला.

दरम्यान, या पाहणीनंतर जवळच्या नातेवाईकांवर आयकर विभागाच्या पडलेल्या धाडीविषयी प्रसिद्धी माध्यमांनी विचारणा केली असता कालच यावर सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले. पुन्हा बोलायला लावू नका.सारखं सारखं सांगायचं कारण नाही.एकदा ते होऊ द्या. उगीच ढगात गोळ्या मारू नका. दूध का दूध,पाणी का पाणी होईल,असे ते म्हणाले.

Edited By : Umesh Ghongade

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT