महाविद्यालये सोमवारपासून गजबजणार;...पण दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश

कोरोनाच्या संकटामुळे जवळपास दीड वर्षे बंद असलेली महाविद्यालये सोमवारपासून गजबजणार आहेत.
Pune University
Pune UniversitySarkarnama
Published on
Updated on

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात कलेल्या घोषषेनुसार सोमवारपासून शहर व जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये सुरू होणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे जवळपास दीड वर्षे बंद असलेली महाविद्यालये सोमवारपासून गजबजणार आहेत.(Colleges will be bustling from Monday; ... but only those who have been vaccinated with two vaccines will be admitted)

शहरात आठवी ते बारावी तर जिल्ह्यात सरसकट शाळा सुरू करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात आंमलात आणण्यात आला. त्यापाठोपाठ आता सर्व वरिष्ठ महाविद्यालययेही येत्या सोमवारपासून सुरू होणार आहेत. महाविद्यालये सुरू होणार असली तरी ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंध करणाऱ्या दोन लशी घेतल्या आहेत.अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्याचे बंधन महाविद्यालयांना घालण्यात आले आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच महाविद्यालये सुरू करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे, असे पवार यांनी सांगितले.

Pune University
अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले; आपण कायद्याचे पालन करणारे; निदर्शने कशासाठी ?

या निर्णयामुळे मागील सुमारे दीड वर्षांपासून बंद असलेली पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालयांची दारे आता उघडली जाणार आहेत.पुणे जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

Pune University
अजित पवार म्हणाले; मी पळून चाललेलो नाही

पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण १ कोटी नऊ लाखांहून अधिक झाले आहे. तसेच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये लसीकरण वाढविले जाणार आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी झाला आहे. यामुळे हे निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.खासगी कार्यालयेदेखील शंभर टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com