Ajit Pawar Program Banner  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : मेळावा अजित पवारांचा, बॅनरवर फोटो शरद पवार गटाच्या नेत्याचा; पुण्यात नेमकं चाललंय तरी काय ?

Sachin Waghmare

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षांत लगीनघाई सुरु आहे. महायुती व महाविकास आघडीची जागावाटपाची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यावर उमेदवारांची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली जात नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यावेळी बॅनरवरती खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो झळकल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार खेड विधानसभा मतदारसंघात गुरुवारी विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले आहेत. अजित पवारांच्या मेळाव्यातील फ्लेक्सवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो झळकला आहे, यामुळं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमोल कोल्हेंच्या फोटो लगतच शिवाजी आढळरावांचा ही फोटो आहे. त्यामुळे मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेल्या अँग्रीकट चर्चा जॊरात रंगली आहे.

वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली. त्यानंतर काही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत (Ajit Pawar) गेले तर काही जण शरद पवारांच्या (Sharad Pawar ) सोबत थांबले. त्यामध्ये दोन्ही गटातील नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू असते, त्यावरती अनेकदा स्पष्टीकरणंही समोर येतात, असे असतानाच गुरुवारी अजित पवारांच्या एका कार्यक्रमात बॅनरवरती खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो लागल्याने चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवारांच्या मेळाव्यातील फ्लेक्सवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो झळकला आहे, यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. अमोल कोल्हेंच्या फोटो लगतच शिवाजी आढळरावांचा ही फोटो आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कडूस येथे शेतकरी मेळावा घेणार आहेत. तत्पूर्वी या मेळाव्याच्या बॅनरवरती अमोल कोल्हे यांचा फोटो दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

...तर खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो

अजित पवार यांनी मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका. त्यासोबतच दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, असे आश्वासन देखील दिले. अजित पवार खेड-आळंदी विधानसभा दौऱ्यावर आहेत. या वेळी ते मेळाव्यात बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT