Chandrashekhar Bawankule : महायुतीचे परफेक्शन बदलेल असे बोलू नका; बावनकुळेंनी दिला इशारा

Chandrashekhar Bawankule Mahayuti Political News : महायुतीतील सर्वच नेत्यांनी मीडियासमोर आणि सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाने बोलू नये, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. तरीही कोणी बोलल्यास त्यावर विचार करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Bjp News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. भाजपने सर्वत्र आढावा बैठक आयोजित करून आघाडी घेतली आहे. महायुती मजबूत आणि एकत्र आहे. महायुतीतील सर्वच नेत्यांनी मीडियासमोर आणि सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाने बोलू नये, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. तरीही कोणी बोलल्यास त्यावर विचार करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

काही लोकांना मीडियासमोर बोलण्याची सवय आहे. त्यामुळे महायुतीचे परफेक्शन बदलंत आहे. सर्वच पक्षांनी काळजी घ्या, एकमेकांबद्दल बोलू नये आणि वाईट विधान करू नये, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे.

किरीट सोमय्या आमचे नेते आहेत, ते नाराज नाहीत. केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगात त्यांनी मतदार यादीचं सुसूत्रीकरण करण्यावर काम सुरु केले आहे. मला वाटतं त्यांना आणखी जबाबदारी द्यावी. मात्र, त्यांनी नकार देत माझ्याकडे आधीच काम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते नाराज नाहीत, असे भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस नेते मलिकार्जुन खरगे यांचा राजीनामा मागत आहोत. राहुल गांधींनी अमेरिकेत केलेल्या विधानावर अद्यापही मल्लिकार्जुन यांनी प्रतिक्रिया दिली नाही. राहुल गांधींच्या भूमिकेवर ते राजीनामा देतील असं वाटलं, मात्र अजूनही त्यांचा राजीनामा नाही. त्यामुळे खरगे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar NCP : संसदेतले कार्यालय शरद पवार गटालाच लोकसभा सचिवालयाने काढले नवे पत्रक

याआधी अपघात प्रकरणात दोनदा बोललोय, त्यामुळं पुन्हा बोलणं योग्य नाही, असे म्हणत याविषयी बोलणं टाळले. पश्चिम विदर्भातल्या अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात आढावा बैठक घेण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठकीत संवाद साधण्यात येणार आहे.

महायुती आगामी विधानसभा निवडणुकीत 51 टक्के मत घेऊन विजयी होईल, यासाठी ही बैठक आणि नियोजन असणार आहे. या बैठकीत आज अकोल्यातल्या पाचही मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
Sushma Andhare Video : नगसेवकाला मारहाणीचा व्हिडिओ अंधारेंकडून व्हायरल; पुन्हा आमदार थोरवे टार्गेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com