Ajit Pawar On NCP Crisis  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar In Baramati : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा पहिल्यांदाच बारामतीत; मतदारांपुढे काय भूमिका ठेवणार?

मिलिंद संगई

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पहिल्यांदाच आपला मतदारसंघ बारामतीत येणार आहेत. यावेळी अजितदादा विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजितदादा यांचा बारामतीकरांकडून शनिवारी (दि. २६ ऑगस्ट) नागरी सत्कार करण्यात येणार असल्याने, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. (Latest Marathi News)

अजितदादा यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सुपे व माळेगाव येथे बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे. नागरी सत्कार होत असल्यामुळे यावेळी भाषणात अजित पवार आपल्या मतदारांपुढे नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे बारामतीकरांसोबतच साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

एरव्ही दर शनिवारी विविध विकास कामांच्या पाहणी निमित्त बारामतीत येणाऱ्या अजितदादांचे मागील अडीच महिने राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बारामतीला येणे झाले नव्हते. त्यामुळे आता दीर्घ कालावधीनंतर अजितदादा बारामतीत येणार असल्यामुळे त्यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी केली आहे.

बारामतीमध्ये अजितदादा यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, मिरवणुकीनंतर शारदा संस्थेच्या प्रांगणात संध्याकाळी त्यांचा नागरिक सत्कार आयोजित केला जाणार असल्याची माहिती, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. बारामतीकरांपुढे अजितदादा आपल्या भाषणात नेमकी काय भूमिका मांडतात, याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT