Latur BJP News : लातूरकरांच्या पार्किंगचा मुद्दा हाती घेत भाजप आक्रमक, नगरसेवकांचा ठिय्या..

BJP Protest News : संघटनेत पुन्हा एकदा `जान` टाकून पदाधिऱ्यांना सक्रिय करण्यासाठीच नव्या नेतृत्त्वाने हे ठिय्या आंदोलन केले.
Latur BJp Protest News
Latur BJp Protest NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : आपल्या विशिष्ट रचनेसाठी देशात प्रसिद्ध असलेली गंजगोलाई ही लातूर जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ आहे. शहरात वाहन पार्किंगला शिस्त लावण्यासाठी खासगी संस्थेला काम दिलेले आहे. (Latur BJP Protest News) मात्र या संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून वाहनांना जामर लावून अव्वाच्या सव्वा दंड आकारला जातोय हे आयुक्तांनी थांबवावे, या मागणीसाठी भाजपचे तीस माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर आंदोलन केले.

Latur BJp Protest News
Dhananjay Munde On Onion Rate : धनंजय मुंडे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार; म्हणाले ,"कांद्याला ऐतिहासिक भाव.."

खरे म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून (BJP)भाजप शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या दोन आमदारांच्या वादात रखडल्या होत्या. मात्र आगामी महापालिकेची निवडणूक समोर ठेवून नुकत्याच भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या रूपाने नियुक्यांना सुरुवात झाली आहे. (Municipal Corporation) शहरातील संघटनेत पुन्हा एकदा `जान` टाकून पदाधिऱ्यांना सक्रिय करण्यासाठीच नव्या नेतृत्त्वाने हे ठिय्या आंदोलन केले.

खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा दंड आकारला जातो आहे. (Latur) संस्थेच्या कर्मचाऱ्यांना गणवेश नसणे, आणि त्यांच्या बेशिस्त वागणुकीबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अशा ज्वलंत विषयाला लातूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळतो, हे गेल्या दोन निवडणुकीत दिसलेच आहे.

तसेच बाजारपेठ आणि त्यास संलग्न भागात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळेच भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील ज्वलंत विषय घेऊन आंदोलन केले आहे. आता कॉंग्रेसचे शहर पदाधिकारीही आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत, महापालिकेत ते कोणता विषय घेतील, याकडे भाजप पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com