Pune News : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमधील सर्वात हाय होल्टेज लढत ही बारामतीमध्ये होत. या लढतींमध्ये तुतारी जोरदार वाजली घड्याळाचे काटे मात्र तितके वेगाने फिरले नाहीत. या लढतीमध्ये महायुती आणि त्याअनुषंगाने उपमुख्यमंत्री म. खडकवासल्यातुन महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले मात्र ते अपेक्षे पेक्षा खूप कमी असल्याने महायुतीच्या हातात निराशाच आल्याचे बोले जात आहे.
या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ सरासरी 55 टक्के मतदान झाले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये 61.70 टक्के मतदान झाले होतै.यंदाच्या निवडणुकीत ही मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीचा फक्त कोणाला बसणार याची चर्चा होती मात्र सुप्रिया सुळे यांनी बारामती, इंदापूर,दौंड,पुरंदर आणि भोरमध्ये चांगली आघाडी घेतली. हि आघाडी कमी करण्याची जबाबदारी भाजपचा गड असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघांवर होते. मात्र मागील २ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा खूप कमी मताधिक्य मिळाले आहे.
मागील दोन निवडणुकांचे निकाल पाहिलास सुप्रिया सुळे यांची त्यांची इतर मतदारसंघांमधून मिळालेली मोठी आघाडी कमी करण्याचं काम हे खडकवासला मतदार संघाने केलेला होते. खडकवासला मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांनी 70 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत सुळे यांना केवळ 86 हजार 993 मते मिळाली, तर कुल यांना 1 लाख 52 हजार 487 अशी विक्रमी मते मिळाली होती. तर, 2014 च्या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी सुळे यांच्यापेक्षा 20 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत सुळे यांना 70 हजार 602 मते, तर जानकर यां ना 98 हजार 729 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत जानकर भाजपाच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढले नव्हते नाहीतर चित्र अजून काहीच वेगळं असतं असं बोललं जात.
खडकवासला मतदारसंघात पाच लाख 38 हजार मतदार आहेत. या मतदारसंघांमध्ये 50 टक्के मतदान झाल्याचे गृहीत धरल्यास दोन लाख 70 हजार मतदारांनी आपला मतदानाचा बजावला आहे.यातील 1 लाख 41928 मतदारांनी आपले मत सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात टाकले तर 1 लाख 21182 मतदारांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले आहे. त्यामुळे यावेळी सुनेत्रा पवार यांना 21 हजारांचे माताधिक्य मिळाले आहे. मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत हे खूपच कमी आहेत. त्यामुळे भाजपचे पूर्ण मतदान हे अजित पवार यांना ट्रान्स्फर झाले नसल्याचे बोले जात आहे. त्यामुळे भाजपचा खडकवासला दादांचा झाला नसल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.