Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

अजितदादा, तुमचा होमवर्क वाढवा : निवृत्त IPS अधिकाऱ्याने दिला सल्ला

Yogesh Kute

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी हिन दर्जाची पोस्ट लिहिल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया आली. केतकीच्या विरोधात दहाहून अधिक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. ती आता पोलिस ठाण्यांच्या वाऱ्या करत आहेत.

या साऱ्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया माजी निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांना लक्षवेधक वाटली आहे.. या अधिकाऱ्याचे नाव आहे सुरेश खोपडे. संघ आणि हिंदुत्ववाद्यांवर वारंवार टीका करणाऱ्या खोपडे यांनी आता अजितदादांना सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादीच्या तरुणांनी शरद पवार साहेबांच्या विरोधात बोलणाराला शोधा आणि फोडा!, असा इशारा दिला होता. याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अजित पवार यांनी त्या तरूणांना सज्जड दम दिला व हा राष्ट्रवादी पक्षाचा हा कार्यक्रम नाही, असेही बजावले. त्यांची ही कृती योग्य असल्याचा निर्वाळा खोपडे यांनी दिला.

कोणी काहीही लिहीत आणि बोलत असेल तर त्याला शोधून काढणे, हे ठीक आहे. पण त्याला फोडा यातून वेगळे अर्थ निर्माण होऊ शकतात. हे गुन्हेगारी कृत्य ठरते. अजितदादांनी यावर घेतलेली भूमिका कायद्याच्या योग्यच आहे, असे म्हणत खोपडे यांनी काही बाबींकडे लक्ष वेधले आहे. केतकी ही ब्राह्मणवर्णीयांची बाजू लढविते. त्यापैकी कांही अपवाद वगळता बहुतेक जणांचा फार जुना व उघड कावा आहे. शरद पवार ब्राह्मणविरोधी आहेत, असे या मंडळींचे मत आहे. 2016 मध्ये आरएसएसच्या नागपूर दसरा मेळाव्यामध्ये एक निर्धार फलक त्यांनी आपल्या डायसवर ठेवलेला होता. त्याचा खोपडे यांनी आशय पुढीलप्रमाणे मांडला आहे.

"कुरुक्षेत्रमे फिर से होगा असुर शक्तिका विनाश!

मन मे है पूर्ण विश्वास!"

त्या कार्यक्रमाअगोदर नुकतेच गोविंद पानसरे व इतर याना असुर ठरवून त्यांची हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सुमारे 16 वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी पत्रक काढून या निर्धाराचा निषेध करून त्या विरुद्ध सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली होती. पुढे त्या मागणीचे काहीच झाले नाही. नंतरच्या काळात आर.एस.एस.कार्यप्रणाली वर मी अनेक पोस्ट लिहील्या. त्याचे उत्तर देण्याऐवजी समर्थकांनी मला ट्रोल केले. धमक्या दिल्या. 18 ऑक्टोबर 2018 साली मी स्वत: दसरा मेळाव्या निमित्त नागपूरला गेलो. मी, डॉक्टर सुरेश खैरनार, नागेश चौधरी या तिघांनी रेशीमबाग येथील आरएसएस कार्यालयासमोर त्यांच्या गुन्हेगारी कृत्याबद्दल निषेध आंदोलन केले. पोलिसांनी आम्हाला अटक केली. त्यानंतर मी 19 नोव्हेंबर 2018 ला नागपूर कोतवाली पोलीस स्टेशनला सविस्तर तक्रार दिली. त्यामध्ये मला धमकी देण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. माझ्या जीवितास धोका आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठा बेकायदा शस्रसाठा केलेला आहे. परवानगीशिवाय शस्त्रासह मिरवणूक काढली जाते, अशा आशयाची दखलपात्र स्वरुपाची तक्रार दिली. गेले तीन वर्ष पाठपुरावा करूनही ती तक्रार अद्याप नोंदविली नाही. दोन महिन्यांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही मी तक्रार अर्ज दिला आहे. अजित पवार यांच्या कार्यालयाला देखील पत्र पाठवून तक्रार अर्ज दिला आहे, अशी माहिती खोपडे यांनी दिली आहे.

तुम्ही सत्तेत असता पवारसाहेबांच्या घरावर हल्ला होतो. आतातर खुद्द त्यांनाच धमकी मिळते. दहा टक्के सरकारी कोट्यातील घर, चौकशीतून सुटका, मलाईदार बदली असल्या कुठल्याच बाबीचा मी पवारांचा लाभार्थी नाही. तरीपण इतर अनेक बाबींबरोबर खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष विचार, वर्तन कृती, दिशा दाखवणारा एकमेव नेता म्हणून त्यांच्या मागे आहोत. त्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींशी मुकाबला करू या. माझ्या 19 नोव्हेंबर2018 तक्रारीची दखल घ्या. तसाच तुम्ही होमवर्क वाढवा ही विंनती, असे खोपडे यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT