Udayanraje, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar On Udayanraje : उदयनराजे भोसलेंच्या साताऱ्यातील उमेदवारीबाबत अजितदादांचे सूचक विधान; म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : अजित पवारांनी रायगडमधून खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली.

Sunil Balasaheb Dhumal

Satara Political News : महायुतीत सातारा लोकसभा जागेवरून दिवसेंदिवस तिढा वाढताना दिसत आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार असल्याने या जागेवर अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. मात्र, येथून भाजपसह शिवसेना शिंदे गटानेही तयारी सुरू केली आहे. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यांच्या उमेदवारीवर मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचक विधान केले आहे. Ajit Pawar On Udayanraje

अजित पवार (Ajit Pawar) गट बारामती, सातारा, शिरूर, परभणी, धाराशिव, नाशिक, रायगड या सात लोकसभा मतदारसंघांबाबत आग्रही आहे. त्याबाबत मंगळवारी (ता. २६) पुण्यातील मेळाव्यात चर्चाही झाली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी रायगडमधून खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली, तर सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमात शिरूरमधून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही स्पष्ट केले.

साताऱ्यातून उदयराजे भोसलेंनी (Uadayanraje Bhosale) दंड थोपटले आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी दिल्लीवारीही केली आहे. यातून सातारा राष्ट्रवादीकडे असला तरी भाजपने ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. दरम्यान, सातारा भाजपला द्यावा किंवा खासदार उदयराजे भोसले यांनी अजित पवार गटात येऊन निवडणूक लढवावी, या पर्यायांची चर्चा आहे. यावर छेडले असता अजित पवार म्हणाले, उदयनराजे भोसले यांना भाजप नेते समजावून सांगतील, असे सूचक विधान केले आहे.

उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात फारसे सख्य नाही, हे सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते त्यांना समजावून सांगतील, या अजित पवारांच्या विधानामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप नेत्यांनी समजावल्यानंतर उदयनराजे भोसले अजित पवार गटात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवणार का? की राज्यसभेच्या खासदारकीवर समाधान मानून महायुती देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रणनीती आखणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT