Lok Sabha Election 2024 : ‘कराड, तुमच्या तिकिटाचे फायनल झाले का?’ खैरेंना उत्सुकता...

Chhatrapati Sambhajinagar Constituency : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व संभाव्य उमेदवार भागवत कराड यांना 'तुमचे तिकीट फायनल झाले का', असे म्हणत चिमटा काढला. निमित्त होते होळीपूजनाचे.
Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Bhagwat Karad-Chandrakant Khairesarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 26 March : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्यांचे डोळे उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे लागले आहेत. भाजपने महाराष्ट्रातील 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत, तर महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना अद्याप उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. अशीच परिस्थिती महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षांची झाली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व संभाव्य उमेदवार भागवत कराड (Bhagwat Karad) यांना 'तुमचे तिकीट फायनल झाले का', असे म्हणत चिमटा काढला. निमित्त होते होळीपूजनाचे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Kolhapur Lok Sabha Constituency : महायुतीच्या 45 मधून कोल्हापूरची एक जागा निश्चित कमी होईल; शाहू महाराजांच्या विजयाचे जयंतरावांकडून भाकीत

यावर मार्ग काढण्यासाठी मुंबईत आणि दिल्लीतही बैठकांचे सत्र सुरू आहे. केवळ संभाजीनगर नाही तर महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघांवर सत्ताधारी शिवसेना, भाजप यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्यापैकीच एक असलेल्या संभाजीनगरमधून कोण लढणार? याची उत्सुकता जशी शिवसेना शिंदे गट आणि भाजपला आहे, त्याहीपेक्षा जास्त शिवसेना ठाकरे गटाला असल्याचे दिसून आले.

ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना लोकसभेची उमेदवारी निश्चित समजली जाते. मात्र, खैरे-दानवे यांच्या वादातून त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दुसरीकडे गेल्या दीड वर्षापासून लोकसभेच्या तयारीला लागलेल्या कराड यांना पक्षाने वेटिंगवर ठेवले आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात गल्ली ते दिल्ली अशा सर्वच ठिकाणी शिवसेना-भाजप युतीचे कायम वर्चस्व होते.

शिवसेना मोठा भाऊ तर भाजप लहान भावाच्या भूमिकेत राहिले. परंतु गेल्या काही वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर जिल्ह्यात भाजप, शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वरचढ ठरत आहे. दोन वेळा आमदार, राज्यात मंत्री आणि सलग चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांची भूमिका जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची समजली जात होती. अगदी आज केंद्रात अर्थ राज्यमंत्री असलेल्या भागवत कराड यांना नगरसेवक आणि त्यानंतर महापालिकेत महापौर आपणच केले, असा दावा खैरे सातत्याने करतात.

Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Solapur, Madha Loksabha : मराठा समाजाचा मोठा निर्णय; सोलापूर, माढ्यातून देणार प्रत्येकी एक तगडा उमेदवार

आता त्याच कराड यांच्याशी लोकसभा निवडणुकीत दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे होळीपूजनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या चंद्रकांत खैरे यांनी भागवत कराड यांना चिमटा काढण्याची संधी काही सोडली नाही. एकमेकांना रंग लावत असतानाच 'तुमचे फायनल झाले का' अशी विचारणा खैरे यांनी केली. तेव्हा राजकारणात जम बसलेल्या कराड यांनी खैरे यांना, आधी तुमचे फायनल झाले का ते सांगा, असे म्हणत टोला लगावला.

या दोन संभाव्य उमेदवारांमधील हा कलगीतुरा तिथे उपस्थित मंत्री अतुल सावे, शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे मात्र दुरूनच पाहत होते. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी संभाजीनगरसह महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. संभाजीनगरात खैरे विरुद्ध कराड असा सामना होतो? की मग खैरे विरुद्ध शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे हे एकमेकांविरुद्ध दंड थोपटतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Edited By : Vijay Dudhale

R

Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Solapur News: मला सोलापूर सोडून का जावं लागतं...? शिक्षण भेटते, पण नोकरी का नाही? शिंदे, सातपुतेंना युवकाने विचारला जाब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com